महाराष्ट्र

अधिकार पदाच्या गाढवाचा काळ अन् लाथांचा सुकाळ, उंचीवर गेलं म्हणून अक्कल असल्याचा भ्रम कशासाठी ?

बीड — हा फोटो आहे पाण्याच्या टाकीवर उंच जागेवर बसलेल्या गाढवाचा या फोटोचे निरीक्षण केल्यानंतर पाहणाऱ्यांच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण होतात जसे की याला खाली कस आणायचं, तो एवढ्या उंचीवर गेला कसा असाच काहीसा प्रश्न गाढवाच्या देखील मनामध्ये निर्माण झाला असेल. मी एवढा उंचीवर चढलो मी किती बुद्धिवान पाण्याच्या टाकी खाली असलेल्या प्रत्येक जण किती निर्बुद्ध बेअक्कल आहे. ते खाली राहिले यातच त्यांची अक्कल समजून आली आहे असं म्हणत मनामध्ये अहंपणा किती निर्माण झाला असेल अशीच काहीशी अवस्था बीडच्या जिल्हा प्रशासनातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांची झाली आहे.
उंचीवर चढून बसलं म्हणजे देवाने खुप अक्कल दिली असा भ्रम निर्माण करत दुसऱ्यांच्या अकला काढणाऱ्या अधिकाऱ्यांची भरमार झाल्यामुळे एकंदरच प्रशासनाची पुरती वाट लागत असल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे.

सरकारी योजनांच्या अनूदानाचे पैसे मिळत नाहीत म्हणून शेतकरी आत्महत्या करतोय. संपादित जमिनीचा मावेजा मिळत नाही म्हणून शेतकरी सरकारी कार्यालयासमोर आत्मदहन करतोय, भ्रष्टाचार्‍यांना पाठीशी घातलं जातंय,वाळू माफियांच्या धुमाकूळ चालू आहे.निसर्गाची होत असलेली हानी रोखण्यासाठी व वाळू माफियांना आळा घालण्यासाठी उपोषण कराव लागतंय, दुसऱ्यांना भाषाज्ञान शिकवत अक्कल काढणाऱ्या अधिकार्‍याचे कान उच्च न्यायालयाने उपटले तरी अजूनही उपरती आलीच नाही. याचिकाकर्ते वकिलांशी सूद्धा संसदीय भाषेत बोलायचं तारतम्य नाही. अधिकाराचा पदाच्या उंचीवर जाऊन बसलं म्हणून एखाद्याचा अपमान करण्याचा अधिकार नसल्याचं न्यायालयाला सांगावं लागलं. अधिकाऱ्याच्या पाठीमागं गेलं तर नक्कीच गाढव लाथाळीचा प्रसाद भेटल्याशिवाय राहणार नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे. आचारसंहिता आहे की कोरंटाइन आहेत की आणखी मुळव्याधी सारख्या व्याधीने त्रस्त आहेत हे सांगितल्याशिवाय लोकांना कळायचं त्यासाठी माध्यमांच्या प्रतिनिधींना बोलवावं लागतं त्यांच्याशी संवाद साधावा लागतो याची आक्कल मात्र यांना नसल्याचं सध्या पहावयास मिळत आहे. उंचीवर बसलं म्हणजे बळच गर्दभ गान ऐकवायच ही हुकूमशाही आहे. गाढव मोकळ्या मैदानात असल असतं पाण्याच्या टाकीवर नसतं तर पाठीवर धोपाटी बसलेली देखील कळाली असती. उंचीवर असल्यामुळे सगळ्यांनीच गर्दभ गान ऐकलं अन् मी किती सुरेल आवाजात गायलो देखील हा भास देखील त्याने करून घेतला. एकंदरच माध्यमांची स्थिती प्रशासनाच्या गाढवापुढे वाचली गीता रात्रीचा गोंधळ बरा होता अशी झाली आहे. गाढवाचा काळ आणि लाथांचा सुकाळ जनता कुठपर्यंत सहन करणार हे येणारा काळच सांगेल.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close