आपला जिल्हा

पालकमंत्र्यांच्या बैठकीला जिल्हाधिकाऱ्यांची दांडी

बीड — पालकमंत्री धनंजय मुंडे हे आज बीडमध्ये विविध विभागांच्या आढावा बैठकी घेत असताना अधिकाराची मस्ती चढलेले जिल्हाधिकारी बैठकीला दांडी मारून स्वतःच्या निवासस्थानी समांतर बैठका घेण्यात मशगुल असल्याचे चित्र निर्माण झाल्यामुळे जनतेमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे.
आज पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली विविध विषयांबाबत आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात घेण्यात येत आहे. या बैठकीमध्ये खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना मिळालेले बोगस बियाणे खते बियाणे निविष्ठा बाबत शेतकऱ्यांच्या प्राप्त तक्रारी कृषी विभागाच्या कारवाई यांना मिळालेले अनुदान नुकसान भरपाई मंजूर पिक विमा यासंदर्भात सकाळी साडेदहा वाजता आढावा बैठकीला सुरुवात झाली यानंतर राष्ट्रीय महामार्ग संदर्भात तसेच दुपारी दोन वाजता जल जीवन मिशन कार्यक्रमाच्या प्रगतीबाबत ते आढावा घेत आहेत. सोमवारी देखील त्यांनी जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी लगातार सात तास जनता दरबार भरवला होता. एकीकडे जनहिताची कामे करण्यात पालकमंत्री व्यस्त असताना दुसरीकडे िल्हाधिकार्‍यांनी मात्र या आढावा बैठकीला दांडी मारल्याचे चित्र पाहावयास मिळाले दुपारी दोन वाजेपर्यंत तरी ते एकाही बैठकीला हजर नव्हते. तुघलकी कारभारामुळे नेहमीच जिल्हाधिकारी वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. भ्रष्टाचार्‍यांना पाठीशी कसे घालता येईल यासाठी आपल्या निवासस्थानी अधिकाऱ्यांसोबत कर्मचाऱ्यांसोबत समांतर बैठका घेत असल्याची खात्रीलायक माहिती उपलब्ध झाली आहे. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे जनतेमध्ये मात्र राहुल रेखावार यांच्या विरोधात रोष निर्माण झाला असून. रेखावार यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी जनतेतून होत आहे. बीड चे पालकमंत्री धनंजय मुंडे या संदर्भात काय भूमिका घेतात याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close