आपला जिल्हा

उच्चशिक्षित असुनही मती फिरली,गाव वाल्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी माती खाल्ली, पदाचा गैरवापर करत न्याय प्रक्रियेला बाधा पोहोचवण्याचा प्रयत्न

 बीड — लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना रंगेहात पकडलेला बीडचा अप्पर जिल्हाधिकारी बी एम कांबळे या लाचखोराला वाचवण्यासाठी या प्रकरणातील सरकारी साक्षीदारांना चौकशीच्या फेऱ्यात अडकवून आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करत मानसिक छळ करण्याचा जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी प्रयत्न सुरू केला असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. लाचखोर बी एम कांबळे हा राहुल रेखावारांच्या गावचा म्हणजेच नांदेडचा आहे. थोडक्यात लाचे च शेण खाणाऱ्या कांबळेला आश्रय देत माती खाण्याचा हा प्रकार जिल्हा प्रशासनाला बदनाम करत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

धनु भाऊ, आपण जिल्ह्याचे पालक आहात. जिल्हाधिकारी तुघलकाची भूमिका घेत प्रशासनाला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. कोरोना संकटकाळात हे अनामिक संकट आहे. त्याचा मुकाबला करण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे असा मनाचा मोठेपणा दाखवत जनतेने जिल्हाधिकाऱ्यांनी मध्यरात्री काढलेल्या आदेशांचा देखील सन्मान केला. परंतु आता या संकटातून जनता बाहेर आलेली असताना जनतेला या कारभाराचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे आपण वेळीच त्यांच्या या कारभाराला वेसन घालण्याची गरज निर्माण झाली आहे. आशा अधिकार्‍यामुळे आपली राज्यातील प्रतिमा कुठेही मलिन होईल असं व्हायला नको अशी सर्वसामान्य जनतेची इच्छा आहे.

अप्पर जिल्हाधिकारी म्हणून कामकाज पाहत असताना बी एम कांबळे ची कारकीर्द नेहमीच वादग्रस्त राहिली आहे. त्याने पुरवठा विभागात झालेल्या अनियमिततेची चौकशी करून अहवाल तयार केला होता यामध्ये चार गोदाम पालाना दोषी ठरवण्यात आले होते. हा अहवाल तयार झाल्यानंतर दुसऱ्यांना आरोपीच्या पिंजर्‍यात उभा करणारा बी एम कांबळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात लाच घेताना रंगेहात पकडला गेला. त्यानंतर बी एम कांबळे हा सेवानिवृत्त देखील झाला. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे.
साक्षीदारावर दबावाचा रेखावार कडून प्रयत्न
बी एम कांबळे च्या लाचखोरीचे प्रकरण न्यायप्रविष्ठ असताना सरकारी साक्षीदार असलेल्या चार जणांच्या पाठीमागे चौकशीचा ससेमिरा लावून न्यायप्रविष्ट प्रकरण सहेतुक बाधित करण्याचा प्रयत्न जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडून केला जात आहे. चौकशीचा ससेमिरा हा या लाचखोर भ्रष्टाचारी असलेल्या बी एम कांबळेने तयार केलेल्या अहवालाचा आधार घेऊन लावला जात आहे.
कांबळेंने शेण खाल्ले, गावचा म्हणून हे माती खाऊ लागले.
भ्रष्टाचारी असलेल्या बी एम कांबळे ने लाचेचे शेण खाल्ले त्याला संरक्षण देण्याच्या उद्देशाने अधिकाराचा गैरवापर करत न्याय प्रक्रियेला बाधा पोहोचवण्यासाठी व लाचखोरी प्रकरणातून कांबळेची निर्दोष सुटका व्हावी यासाठी राहुल रेखावार प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. हे केवळ जिल्हाधिकारी राहुल रेखावार व भ्रष्टाचारी बी एम कांबळे हे नांदेडचे म्हणजे एकाच गावचे असल्यामुळे गावासाठी माती खाण्याचा हा प्रकार असल्याच मत जनतेतून व्यक्त केलं जात आहे.
जिल्हाधिकाऱ्यांचा वर्गमित्र भेटला अन मग खरा खेळ सुरू झाला!
जिल्हाधिकारी राहुल रेखावार व भ्रष्टाचारी बी एम कांबळे हे नांदेडचे
बी एम कांबळेची लाचखोरीच्या प्रकरणातून निर्दोष सुटका व्हावी यासाठी बी एम कांबळे चा नातेवाईक परंतु जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या वर्गमित्राने गळ घातली. येथून पुढे खऱ्या खेळाला व अधिकाराच्या गैरवापराला खरी सुरुवात झाली. सरकारी साक्षीदारांना त्यामुळे चौकशीच्या फेऱ्यात अडकून मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न केला जाऊ लागला.
रेखावारांच्या दृष्टीने कांबळे धुतल्या तांदळाचा
लाच घेताना रंगेहात पकडले ला बी एम कांबळे रेखावार यांच्या दृष्टीने धुतल्या तांदळासारखा आहे म्हणूनच पकडल्या जाण्यापूर्वी त्याने तयार केलेल्या पुरवठा विभागातील अनियमिततेच्या अहवालाला प्रमाण मानून न्यायालयाच्या न्यायप्रक्रियेला बाधा पोहोचली तरी चालेल पण साम-दाम-दंड-भेद याचा वापर करत सरकारी साक्षीदारांचा मानसिक छळ अहवालाचा आधार घेऊन केला जात आहे. एकंदरच दंडाधिकारी असलेल्या राहुल रेखावार यांना बी एम कांबळे निर्दोष सोडवायचाच आहे मग त्यासाठी भलेही न्यायालयीन प्रक्रिया बाधित झाली सरकारी साक्षीदार मानसिक छळाला कंटाळून आपल्या साक्षी फिरवल्या तरी चालेल अशी भूमिका राहुल रेखावार यांनी घेतली आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close