क्राईम

वाळुमाफियांनी पोलीस प्रशासनाच्या अब्रुची लक्तरे वेशीवर टांगली,साक्षीदारांवर जिवघेणे हल्ले, वाळुमाफियांच्या नांग्या ठेचण्यास प्रशासन सक्षम आहे काय??,पीडीतांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे —.गणेश ढवळे लिंबागणेशकर

बीड — आष्टी तालुक्यातील मौजे घोंगडेवाडी येथिल 200 ब्रास वाळू साठा गायब व 54 लाख 19 हजार रूपये दंड वसूल करण्यात यावा यासाठी डाॅ.गणेश ढवळे यांनी गृहमंत्री व पोलीस महासंचालक मुंबई यांना लेखी तक्रार करून आंदोलनाचा ईशारा दिल्यानंतर गृहमंत्री यांच्या कार्यालयाने 23 नोव्हेंबर रोजी व पोलीस महासंचालक यांनी 18 डिसेंबर रोजी पोलीस अधीक्षक बीड यांना यासंदर्भात चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश दिले त्यानंतर चौकशी केल्यानंतर आरोपीची नावे सांगणा-या साक्षीदारांवर काठ्या ,दगडाने जीव घेणा हल्ला करून जीवे मारण्याची धमकी दिली,याप्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमींवर नगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.त्यांनी न्याय मिळवण्यासाठी डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखालील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे.
सविस्तर माहितीसाठी:- आष्टी तालुक्यातील मौजे घोंगडेवाडी येथिल सिना पात्रातील 200 ब्रास वाळु अवैध रीत्या आनिल माळशिखरे यांनी त्यांच्या शेतात ठेवली ,संबधित प्रकरणात तहसिलदार निलिमा थेऊरकर यांनी मंडळ आधिकारी तलाठी यांच्या समवेत स्थळपंचनामा करून वाळु जप्ती करून 54 लाख 19 हजार 20 रूपये दंड 7 दिवसात जमा करण्याचे आदेश दिले व वाळुसाठा आरोपी आनिल माळशिखरेयांचेसख्खेथोरलेबंधुजनार्दधमाळशिखरे पोलीस पाटील यांच्या ताब्यात दिला. जो दोन महिन्यानंतरगायबझाला. दंड भरणे तर दुरच परंतु दिनांक 19 डिसेंबर रोजी चौकशीसाठी आलेल्या महसुल पथकाला आरोपीची नावे सांगितली म्हणुन संजय नेमीचंद माळशिखरे, नेमीचंद माळशिखरे यांना वाळु तस्करीतील आरोपी आनिल भिमराव माळशिखरे, जनार्दन भिमराव माळशिखरे, भिमराव रंगनाथ माळशिखरे ,निखिल आनिल माळशिखरे यांनी प्लास्टीकच्या काठ्या, दगडाने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली.गंभीर जखमींना नगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणात गुन्हा रजिस्टर नंबर 0329 दि.19/12/2020 व भादवि 1860 कलम 324 ,323,143,147,149,504,506 प्रमाणे आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

महसूल व पोलिस प्रशासनाची मिलिभगत, गृहमंत्री व पोलीस महासंचालकाचे पोलीस अधिक्षकांना कारवाईचे आदेश असुनही कारवाई नाहि:-डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
दहा महिन्यापासून याप्रकरणात वारंवार लेखी तक्रार करून व विविध दैनिकातुन बातम्या प्रसिद्ध होऊन सुद्धा महसूल व पोलीस प्रशासनातील काही लोक आर्थिक हितसंबंध जोपासत गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करीत आहेत. साक्षीदारांवर हल्ले होत आहेत पोलिस प्रशासनाच्या अब्रुची लक्तरे वेशीवर टांगली जात आहेत वाळु माफियांच्या नांग्या ठेचण्यासाठी प्रशासन सक्षम आहे काय?हा खरा प्रश्न आहे याप्रकरणात आंदोलन करणार वाळूचे टेंडर सुरू करण्यात यावेत,म्हणजे प्रशासनाचा महसूल बुडणारनाही, वाळुतस्करी प्रकरणात संबधित महसूल व पोलीस प्रशासनावर जबाबदारी निश्चित करून प्रशासकीय कारवाई करण्यात यावी तसेच महसुल बुडवणारांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी तक्रार मुख्यमंत्री, गृहमंत्री, महसुलमंत्री, विभागीय आयुक्त,पोलीस महासंचालक याना केली होती,त्यानंतर दिवसापासून.23 नोव्हेंबर रोजी गृहमंत्री कार्यालया मार्फत व दि.17 डिसेंबर रोजी पोलीस महासंचालकांनी संबधित प्रकरणात कारवाई करण्याचे आदेश देऊन सुद्धा अद्याप कारवाई करण्यात आली नाही.यावेळी आंदोलनात शेख युनुस च-हाटकर, बाळू माळशिखरे,आप्पा माळशिखरे, सविता माळशिखरे,वंदना माळशिखरे,शारदा माळशिखरे आदि.वाळुमाफियांनी हल्ला केलेले हजर होते

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close