आपला जिल्हा

लिंबागणेश — अंजनवती– घारगाव रस्त्याचे काम अर्धवट उरकण्याचा डाव हाणून पाडणार —बाळासाहेब मोरे

चौसाळा — आधीच रडत पडत सूरू असलेले कामाला अखेर मुहूर्त मिळाला असला तरी सदरचे काम अंदाजपत्रकानूसार होत नसल्याने ग्रामस्थ दबक्या आवाजात नाराजी व्यक्त करत आहेत.
रस्त्याच्या कामाला वापरण्यात येणारी खडी व मूरूम अत्यंत उत्तम प्रकारचा असल्याने गावकरी समाधानी आहेत मात्र रस्त्यावरील चूकीच्या पद्धतीने बांधण्यात आलेल्या पुलामुळे व अंजनवती ते अंजनवती फाटा याच्या मधील खराब झालेल्या पुलाचे काम न करण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे गावकऱ्यांमध्ये प्रचंड रोष असून सदरील रोषाला एम टी कंट्रक्शन बीड चे मालक व सदरील कामाचे गुत्तेदार जुमानत नसल्यामुळे नागरिकांनी रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे वेळोवेळी चुकीच्या कामाबद्दल गुत्तेदार व कामावरील इंजिनीयर साहेबांना नागरिकांनी सूचना व विनंती करूनही गुत्तेदार व इंजिनियर दोघेही जाणीवपूर्वक दुर्लक्ष करताना दिसत आहे त्यामुळे भाजपा किसान मोर्चा बीड तालुकाध्यक्ष बाळासाहेब मोरे पाटील यांच्या नेतृत्वाखाली माननीय जिल्हाधिकारी राहुल रेखावार साहेब व विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर साहेब या दोघांची भेट घेऊन सदरील काम अंदाज पत्रकाप्रमाणे करण्यात यावे अशी मागणी करण्यात येणार आहे .

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close