आपला जिल्हा

अर्धवट राहीलेले श्री खंडोबा मंदीराचे विकास कामे पुर्ण करणार -नगराध्यक्ष शेख मंजुर

            • सर्वांचा उपस्थित रक्तदान शिबिर संपन्न

माजलगांव — शहरातील सर्वांचेच आराध्य दैवत व कुल दैवत श्री खंडोबा मंदीरात चंपाषष्ठी निम्मित रविवार रोजी सकाळी 12 वाजता रक्तदान शिबिराचे उद्घाटन माजलगांव चे नगरध्यक्ष शेख मंजुरभैया तर कार्यक्रमाचे अध्यक्ष पञकार संघाचे अध्यक्ष उमेशभैया मोगरेकर व प्रमुख पाहुणे म्हणुन जेष्ठ पञकार पुरूषोत्तम करवा टेंबे गणेश मंडळा चे अध्यक्ष अंनत (शास्ञी ) जोशी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला .


यावेळी श्री खंडोबा मंदीराचे पुजारी सहीत उपस्थित भक्तांनी उपस्थित मान्यवर यांच्या पुढे श्री खंडोबा मंदीरातील लोंखडी जाळ्या ,मंदीरातील फरशी ,व मंदीरासमोरील गट्टु सहीत अर्धवट राहीलेल्या कामामुळे पावसाचे पाणी सभागृहात शिरते त्यामुळे भक्ताना दर्शनासाठी कसरत करावी लागते. अर्धवट सुशोभिकरणाचे राहीलेले काम व इतर विकास कामे करून देण्याची मागणी केली आसता विकास कामानिमित बोलतानां नगरध्यक्ष शेख मंजुर म्हणाले की श्री खंडोबा मंदीर है सर्व आकरा पकड जातीचे जागृत देवस्थान आहे .या मंदीरातील अर्धवट राहीलेले कामे मी पुर्ण करीन कार्यक्रमामध्ये भक्त श्रीराम गिडगिले ,अँड डाके ,कृष्णा थोरात ,राजेश खनाल ,वेंदात देशमुख , सिंधु देशमुख , अभिजीत ढेंबरे सहीत सर्वांची उपस्थिती होती सुञसंचलन पञकार उमेश मोगरेकर यांनी केले तर आभार विजय देशमुख सर यांनी मानले

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close