क्राईम

मोटरसायकल च्या समोरासमोर झालेल्या अपघातात एक ठार दोन गंभीर जखमी

बीड — पाटोदा – मांजरसूंबा महामार्गावर दोन दुचाकी मध्ये झालेल्या अपघातात एकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर अन्य दोन जण जखमी झाले आहेत .हा अपघात रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडला .
पाटोदा मांजरसुंबा महामार्गावर असलेल्या मोरगाव फाटा याठिकाणी शाईन मोटारसायकल क्रमांक एम एच 16 ए.एच. व बुलेट क्र. एम एच 23 बी ए 36 68 ची समोरासमोर धडक झाली. या दुर्घटनेमध्ये राजेश मुरलीधर कदम राहणार सौंदाणा तालुका पाटोदा या 24 वर्षीय युवकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला हा अपघात रात्री पावणे आठच्या सुमारास घडला. राजेश कदम याच्या पाठीमागे बसलेली त्यांची बहीण राणी भारत बावणे रा. वाघीरा ता पाटोदा ही गंभीर रित्या जखमी झाली परंतु तिच्या जवळ असलेले बाळ सुखरूप आहे. तसेच मोरगाव तालुका बीड येथील शुभम भड हे देखील गंभीर जखमी झाले असून जखमींना जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले मात्र याठिकाणी राणी बावणे यांची प्रकृती बिघडल्यामुळे तिला पुढील उपचारासाठी इतरत्र हलविण्यात आले आहे. या दुर्घटनेत मृत झालेला राजेश कदम याचे सहा महिन्यापूर्वीच लग्न झाले होते तसेच राजेश हा एकुलता एक होता.या घटनेनंतर विलास जाधव पोलीस उपनिरीक्षक नेकनुर पोलीस ठाणे घटनास्थळी दाखल, लिंबागणेश पोलीस ठाण्याचे सुरेश पारधी, संतोष राऊत,गव्हाणे, ढाकणे महादेव हजर होते शवविच्छेदनासाठी लिंबागणेश प्राथमिक आरोग्य केंद्रात मृतदेह पाठवण्यात आला आहे .

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close