आपला जिल्हा

आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या सुचनेवरून शहेंशाहवली दर्गाह ते कंकालेश्‍वर मंदिर सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम सुरू

      • उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर यांच्या हस्ते कामाची सुरूवात

      • कामाचा दर्जा आणि गुणवत्ता टिकवण्याच्या सूचना

बीड —- बीड शहरातील रखडलेली कामे आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या सूचनेवरून सुरू करण्यात आली आहेत. शहरातील शहेंशाहवली दर्गा ते कंकालेश्‍वर मंदिर व परिसरातील रस्त्याचे कामे उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर आदींच्या उपस्थितीत सुरू करण्यात आली आहेत. ही सर्व कामे दर्जेदार करून घेण्यासाठी आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांचे कार्यकर्ते व नगरसेवक उभे आहेत. या रस्त्यांच्या कामाची गुणवत्ता व दर्जा टीकला पाहिजे, त्यात कसलाही निष्काळजीपणा नको अशा सूचना पालिका प्रशासन व संबंधित कंत्राटदारास उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर यांनी दिल्या आहेत. शहेंशाहवली दर्गाह ते कंकालेश्‍वर मंदिर रस्ता काम सुरू करण्यात आल्याने या भागातील नागरिकांनी आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांचे आभार मानले आहेत.

बीड शहरातील मागील अनेक वर्षापासून विकास कामे नगराध्यक्षांनी जाणीवपुर्वक रखडलेली आहेत. सन 2012-13 तील कामे आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्यामुळेच सन 2019 मध्ये होवू शकली. नसता नगराध्यक्ष व पालिकेतील अधिकार्‍यांनी संगनमत करून सदरील रस्ते कागदावर दाखवून निधी उचलण्याचा डाव आखलेला होता. आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या माध्यमातून सुभाष रोड, जिल्हा रूग्णालय ते बशीरगंज ही दर्जेदार रस्ते होवू शकली. अशीच अनेक रस्ते शहरात करून घेण्यासाठी आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर यांच्यासह नगरसेवकांची टीम रस्त्यावर उभी असते. शहरातील अनेक भागातील रस्ते रखडलेली आहेत. या रखडलेल्या रस्त्यांपैकी शहेंशाहवली दर्गा ते कंकालेश्‍वर मंदिर या सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम उपनगराध्यक्ष हेमंत दादा क्षीरसागर यांच्या हस्ते सुरू करण्यात आले. या रस्त्याची गुणवत्ता व दर्जा टिकवण्यासाठी या भागातील आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांचे कार्यकर्ते रस्त्यावर करडी नजर ठेवणार आहेत. यावेळी माजी नगरसेवक हाफीज इनामदार, रईस भाई, मुजीब भाई, सुशील जाधव, जाहिर खान, मुमतजीब इनामदार, कपील खान, जुबेर शेख, शेख इसाक, दत्ता जाधव, शारेख मोमीन, आदील खान, अब्दुल शेख, नगरसेवक मोमीन मोहसीन, पंकज बाहेगव्हाणकर आदी यावेळे उपस्थित होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close