महाराष्ट्र

अखेर आष्टी करमाळ्यात धुमाकूळ घालणाऱ्या नरभक्षक बिबट्याला ठार करण्यात यश

बीड– आष्टी आणि सोलापूर जिल्ह्यात धुमाकूळ घालत सहा जणांचा बळी घेतलेल्या नरभक्षक बिबट्याला ठार मारण्यात वन विभागाच्या शार्प शुटरला शुक्रवारी यश आले आहे. करमाळा तालुक्यातील वांगीमध्ये या बिबट्याचा अंत करण्यात आला असून त्याला ठार मारण्यात आल्याने शेतकऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

https://youtube.com/shorts/zl114s1DtCc

आष्टी तालुक्यातील तिघांचा बळी घेतल्यानंतर बिबट्याने करमाळा तालुक्याकडे आपला मोर्चा वळविला होता.या बिबट्याने त्या परिसरात धुमाकूळ घालत तीन ते चार जणांचा जीव घेतला.राज्यभरातील वन विभागाची पथके बिबट्याला ठार मारण्यासाठी करमाळा परिसरात मागील १५ दिवसांपेक्षा अधिक कालावधीपासून तळ ठोकून होती.अखेर शुक्रवारी सायंकाळी ६ च्या सुमारास वन विभागाच्या पथकाला या बिबट्याला ठार मारण्यात यश आले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close