आपला जिल्हा

पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या निर्देशाने केज तालुका संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती गठित

      • गोटेगाव येथील बालासाहेब बोराडे यांची अध्यक्षपदी निवड

      • शिरूर घाटचे वचिष्ट (बाबुराव) सांगळे यांची सदस्यपदी निवड

बीड  —-  बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे, यांच्या निर्देशानुसार केज तालुका संजय गांधी निराधार अनुदान योजनेची केज तालुका स्तरीय समिती गठित करण्यात आली आहे. गोटेगाव येथील बालासाहेब बोराडे यांची या समितीच्या अध्यक्षपदी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी नियुक्ती केली आहे.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत संजय गांधी निराधार अनुदान योजना राबविण्यात येते. या योजनेअंतर्गत समाजातील निराधार वंचितांना लाभ मिळावा यासाठी स्थानिक तहसीलदार यांना सदस्य सचिव घोषित करून स्थानिक सामाजिक व अन्य क्षेत्रात काम करणाऱ्या प्रतिष्ठित नागरिकांची समिती स्थापन करण्यात येते.

याअंतर्गत गोटेगाव ता. केज येथील बालासाहेब बोराडे यांची अध्यक्षपदी तसेच कपिल मस्के, सौ. अश्विनी सोनवणे, सतीश गोरे, वचीष्ट सांगळे, मधुकर तपसे, लक्ष्मण काळे, श्रीकांत घुले, रत्नाकर शिंदे, नारायण शिंदे यांची विविध क्षेत्रातील अशासकीय सदस्य पदी तर केज पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांची शासकीय प्रतिनिधी म्हणून निवड जाहीर करण्यात आली आहे. तसलीदार, केज हे या समितीचे सदस्य सचिव म्हणून काम पाहतील.

समितीला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा योग्य वापर करून या योजनाचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोचवण्यासाठी सक्रिय सहभाग घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त करत ना. धनंजय मुंडे, माजी खा.रंजनीताई पाटील,जि. प. उपाध्यक्ष बजरंग सोनवणे ,कॅाग्रेस जिल्हाध्यक्ष पापा मोदी , शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन मुळुक तसेच माजी आ. पृथ्वीराज साठे यांनी समितीच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close