आपला जिल्हा

अंबाजोगाई तालुका दक्षता समितीच्या अध्यक्षपदी ना. धनंजय मुंडे;  शहर समितीच्या अध्यक्षपदी आ. नमिता मुंदडा

दोन्ही समित्यांच्या सहअध्यक्ष पदी आ. संजय दौंड तर उपाध्यक्षपदी नगराध्यक्षा सौ. रचना मोदी यांची नियुक्ती

बीड  —-  अंबाजोगाई तालुक्यातील राज्य शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागामार्फत करण्यात येणाऱ्या विविध जीवनावश्यक वस्तूंच्या वितरण व्यवस्थेच्या दक्षता समितीचे अध्यक्षपद जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांना देण्यात आले आहे. नगर पालिका स्तरावर अंबाजोगाई शहरासाठी काम करणाऱ्या याच दक्षता समितीच्या अध्यक्षपदी ना. धनंजय मुंडे यांच्या निर्देशानुसार आ. नमिता मुंदडा यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

विधान परिषद सदस्य आ. संजय दौंड यांची तालुका व शहर या दोन्ही समित्यांचे सहअध्यक्ष म्हणून तर अंबाजोगाईच्या नगराध्यक्षा सौ. रचना सुरेश मोदी यांची उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्याचा आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी निर्गमित केला आहे.

अन्न व नागरी पुरवठा विभागामार्फत स्वस्त धान्यासह विविध जीवनावश्यक वस्तूंच्या सार्वजनिक पुरवठ्यावर नियंत्रण व देखरेख ठेवण्यासाठी ही दक्षता समिती तीन वर्षांनी एकदा नेमण्यात येते. मागील दक्षता समितीचा कार्यकाल संपून ती बरखास्त झाल्याने पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी यांनी दक्षता समितीची नवीन कार्यकारिणी जाहीर केली आहे.

अंबाजोगाई तालुका दक्षता समितीमध्ये ना. धनंजय मुंडे अध्यक्षपदी, आ. संजय दौंड – सहअध्यक्ष, नगराध्यक्षा सौ. रचना सुरेश मोदी – उपाध्यक्षा, तसेच सदस्य म्हणून पं. स.सभापती सौ. विजयमाला जगताप, गटविकास अधिकारी अंबाजोगाई, श्रीमती बबिता आडे, श्रीमती गंगाबाई टेमकर, श्रीमती शीतल लहाने, विरोधी पक्षाचे सदस्य म्हणून मुक्तार इस्माईल देशमुख, श्रीमती सरस्वती सोळंके, स्वस्त धान्य दुकानदार प्रतिनिधी म्हणून महादेव लव्हारे, तसेच सदस्य म्हणून महादेव वाघमारे, श्रीमती कुसुमबाई दहिभाते, वामन जाधव यांची नियुक्ती करण्यात आली असून तहसीलदार अंबाजोगाई हे या समितीचे सदस्य सचिव म्हणून काम पाहतील.

अंबाजोगाई नगर परिषद स्तरावरील दक्षता समितीच्या अध्यक्षपदी आ. नमिता मुंदडा, सहअध्यक्षपदी आ. संजय दौंड तर उपाध्यक्ष पदी नगराध्यक्षा सौ. रचना सुरेश मोदी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या समितीत सदस्य म्हणून श्रीमती महानंदा जाधव, श्रीमती संजीवनी देशमुख, विरोधी पक्षांचे सदस्य म्हणून प्रकाश लखेरा, श्रीमती मेनका कांबळे, सदस्य म्हणून अविनाश साठे, श्रीमती लक्ष्मीबाई बरडे, स्वस्त दुकानदार प्रतिनिधी म्हणून सुभाष स्वामी, ग्राहक प्रतिनिधी म्हणून शेख अनिसोद्दीन, सदस्य म्हणून छोटु गवळी, बालाजी शेरेकर यांची नियुक्ती करण्यात आली असून तहसलीदार अंबाजोगाई हे या समितीचे सदस्य सचिव म्हणून काम पाहतील.

या दोनही दक्षता समित्यांवर शासन नियमाप्रमाणे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी एक एक सदस्य सुचवणे अभिप्रेत असून उर्वरित समिती जिल्हाधिकाऱ्यांनी गठित केली आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यावर देखरेख ठेवण्यासाठी नेमलेल्या या समितीने प्रामाणिक व समाजाभिमुख धोरणातून नागरिकांच्या हितार्थ काम करावे अशी अपेक्षा व्यक्त करत जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यासह रा.कॉ.चे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी, शिवसेना जिल्हा प्रमुख सचिन मुळूक माजी आ. पृथ्वीराज साठे तसेच महाविकास आघाडीतील सर्व पदाधिकाऱ्यांनी सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close