आपला जिल्हा

तरुण हरहुन्नरी पत्रकार महेश जोशी यांचे निधन

बीड — बीडचे वृत्तपत्र छायाचित्रकार जोशी यांचे अल्पशा आजाराने शुक्रवारी पहाटे अल्पशा आजाराने उपचारादरम्यान निधन झाले मृत्यूसमयी ते 41 वर्षांचे होते.
गेल्या काही महिन्यांपासून महेश जोशी हे आजारी होते त्यांच्यावर औरंगाबाद येथील खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरु होते आज पहाटेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.प्रेस फोटोग्राफर म्हणून जबाबदारी पार पाडली. अतिशय मनमिळाऊ स्वभाव असलेल्या महेश जोशी चे प्रत्येकाशी आपुलकीचे प्रेमाचे संबंध होते. त्यांच्या पश्चात आई-वडील पत्नी एक मुलगी आहे. महेश जोशी यांच्या पार्थिवावर 18 डिसेंबर रोजी सकाळी 9.30 वाजता अमरधाम स्मशानभूमी, नविन मोंढा रोड, बीड या ठिकाणी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. जोशी कुटुंबीयांच्या दुःखामध्ये ‘सह्याद्री माझा ‘परिवार सहभागी आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close