आपला जिल्हा

ब्रम्हगाव-मुगगाव-सावरगावघाट निकृष्ट रस्त्याप्रकरणात विभागीय आयुक्तांचे जिल्हाधिका-यांना कार्यवाहीचे आदेश

बीड — पाटोदा तालुक्यातील ब्रम्हगाव-मुगगाव-सावरगावघाट (भक्तीगड)या ८ किलोमीटर रस्त्याचे अंदाजे किंमत ४ कोटी ४३ लाख रूपये अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम झाले असून गुणविभागा मार्फत तपासणी करून संबंधित भ्रष्टाचार प्रकरणात चौकशी करून कठोरात कठोर कारवाई करून अपहारीत रक्कम शासन तिजोरीत जमा करण्यात यावी यासाठी विभागीय आयुक्त कार्यालय समोर दि. २ नोव्हेंबर रोजी धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन दिल्यानंतर विभागीय आयुक्तांनी जिल्हाधिकारी बीड यांना सदर प्रकरणात स्वतः लक्ष देऊन निवेदनात नमूद करण्यात आलेल्या मुद्दयाच्या अनुषंगाने नियमानुसार योग्य ती आवश्यक कार्यवाही करून केलेल्या कार्यवाहीचा अनुपालन अहवाल विलंब न लावता सादर करण्यास सांगितले आहे.

पाटोदा तालुक्यातील सावरगावघाट ऊर्फ भक्तिगड या तीर्थक्षेत्र विकासासाठी पंकजाताई मुंढे तत्कालीन ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री बीड यांनी आ.सुरेश आण्णा धस यांच्या विनंतीवरून राष्ट्रीय महामार्ग ५७ ते ब्रम्हगाव-मुगगाव-सावरगावघाट या ८ किलोमीटर रस्त्यासाठी ४ कोटी ४३ लाख रूपये निधी मंजूर करून दिला. १० जुलै रोजी आ.सुरेश आण्णा धस यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले, मात्र दोन महिन्यातच निकृष्ट दर्जाच्या कामाचे पितळ उघडे पडले.रस्ताकाम पुर्णपणे उखडलेले, कमी डांबर वापरल्यामुळे खडी उघडी पडलेली, साईडपट्ट्या सुद्धा मुरूमाने न भरता काळ्या मातीने भरलेल्या.ऊखडलेल्या खडीमुळे दुचाकी वाहन चालकांचे घसरून पडण्याचे प्रमाण वाढलेलेेआहे . यामुळेच या निकृष्ट रस्त्याप्रकरणात गुणनियंत्रक विभागामार्फत तपासणी करून संबंधित दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी दि.२५ ऑक्टोबर रोजी विभागीय आयुक्तांना निवेदन देऊन दि. २ नोव्हेंबर रोजी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याबद्दल निवेदन सादर केले होते त्यातक्रारीच्या अनुषंगानेच विभागीय आयुक्तांनी जिल्हाधिकारी बीड यांना पत्र पाठवले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close