क्राईम

बीड तालुक्यातील मासापूर तांड्यावर सापडली गांजाची शेती

बीड — आष्टी तालुक्यातील कारखेल येथे अंभोरा पोलिसांनी गांजाचे सोळा झाड जप्त केल्यानंतर आज बीड तालुक्यातील मासापूर  तांड्यावर गांजाची सुमारे 63 झाडे जप्त केल्याची घटना घडली आहे.
आष्टी तालुक्यातील कारखेल येथे घराशेजारील शेतात गांजाची सोळा झाडे मंगळवारी अंभोरा पोलिसांनी जप्त केली होती. त्यानंतर बुधवारी स्थानिक गुन्हे शाखेने बीड तालुक्यातील मासापूर तांडा  परिसरात शेतामध्ये गांजाची त्रेसष्ट झाडे लावली असल्याचे उघडकीस आणले याप्रकरणी राजाराम दशरथ लांडे वय 55 वर्ष याच्या विरोधात पिंपळनेर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून जप्त करण्यात आलेल्या 63 गांजाचे झाडांची वजण दोन किलो असल्याची माहिती मिळाली आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक सतीश वाघ सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद कांगूणे संजय जायभाये, बालाजी दराडे काळे बागवान राहुल शिंदे यांनी केली.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close