क्राईम

कांदा घेऊन जाणाऱ्या टेम्पोला अपघात तीन ठार

नेकनूर — कांदा घेऊन जात असलेल्या
टेम्पोचे टायर फुटल्याने टेम्पो डिव्हाडरवर जाऊन जोरात धडकला. या अपघातात चालकासह दोन शेतकरी ठार झाले तर एक जण गंभीररित्या जखमी झाला आहे. ही घटना रात्री दोन वाजता तुळजापूर जवळच्या घाटात घडली. या दुर्दैवी घटनेने नेकनूरसह निवडूंगवाडीवर शोककळा पसरली आहे.
नेकनूर जवळ असलेल्या निवडूंगवाडी गोवरवाडी येथील तीन शेतकर्‍यांनी आपला कांदा एकत्रित करून तो सोलापूरच्या बाजार पेठेला टेम्पो क्र. एम.एच. 16 ए.ई. 7704 यामध्ये घेऊन जात होते. रात्री दोन वाजण्याच्या सुमारास टेम्पोचे टायर अचानक फुटल्याने टेम्पो तुळजापूरच्या घाटात डिवायडरवर जोरात धडकला. यात टेम्पो चालक शेख सज्जाद सकलेन वय ४०, रा. नेकनूर,देवराव तुळशीराम शिंदे वय ५५ रा. गोवरवाडी नेकनूर, मोहन भगवान मुंडे वय ४५, रा. निवडूंगवाडी हे तिघे ठार झाले तर भागवत शिवाजी मुंडे वय ४०, रा. निवडूंगवाडी हे गंभीररित्या जखमी झाल्याने त्यांना उस्मानाबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती नेकनूर आणि निवडूंगवाडी येथील नागरिकांना झाल्यानंतर अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली होती. या दुर्दैवी घटनेने नेकनूर, निवडूंगवाडी, गोवरवाडी येथे शोककळा पसरली आहे. दरम्यान मयत चालक नेकनूर येथील असून आपल्या मनमिळावू स्वाभाने ते सर्वत्र परिचीत होते. त्यांच्या अपघाती निधनामुळे नेकनूर येथील व्यापार्‍यांनी बंद ठेवून दुख व्यक्त केले.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close