आपला जिल्हा

केंद्रे च्या काळात आय मायच्या उद्धारात चौसाळकरांच्या दिवसाचा शेवट आणि सुरुवात

बीड — षंढगिरीची नीती (न) अवलंबिलेल्या व अर्थ सैनिकांना (बेवडे) चालना देणाऱ्या ‘धार्मिक’तेमूळे दारूबंदी विभाग असून नसल्यात जमा झाला आहे. त्यातच भरीस भर म्हणून नेकनूर पोलीसांच्या डोळ्यादेखत दारूविक्री होत असली तरी नुसती बघ्याची भूमिका घेतल्यामुळे चौसाळकरांच्या दिवसाचा शेवट व सुरुवात आय मायच्या उध्दाराने होत असल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कर्तव्यदक्ष आयुक्त नितीन धार्मिक यांच्या नेतृत्वाखाली सध्या जिल्ह्यात परवाना घेऊन दारू विक्री करण्याची गरज राहिली नाही. फक्त पाकीट तयार ठेवलं की दारू विक्रीला परवानगी हा विभाग देत असल्याचं पहावयास मिळत आहे परिणामी जिल्ह्यामध्ये हातभट्टी देशी दारू, नकली बनावटी दारू यांची विक्री सर्रास सुरू आहे. यातून राज्याच्या तिजोरीत किती भर पडते हे माहित नसलं तरी पैशालाच धार्मिकता मानणाऱ्या ‘निती ‘ने अधिकाऱ्यांची तिजोरी मात्र भरत आहे. यातच भरीस भर म्हणून नेकनूर पोलीस ठाण्याचे कारभारी केंद्रे यांनीदेखील हातात हात घालून धार्मिक च्या नीतीला साथ देण्याचा काम सुरू केला आहे. परिणामी धुळे सोलापुर राष्ट्रीय महामार्ग सोबतच राज्य मार्गावर असलेल्या हॉटेल व टपऱ्यांमधून देखील सर्रास दारू मिळत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. चौसाळा परिसरातील तरुणाई मोठ्या प्रमाणात याकडे आकर्षिली जात असल्यामुळे सामाजिक स्वास्थ्य मात्र बिघडू लागले आहे. तळीरामांच्या त्रासामुळे महिलांना दिवसाढवळ्या रस्त्यावरून वावरणे देखील अवघड होऊन बसले आहे. या व्यवसायाला जोड म्हणून मटका व पत्त्याचे क्लब देखील राजरोस सुरू आहेत. दररोज पेट्रोलिंगला येणारे पोलीस दुभत्या जनावरा सारखं या धंद्याकडे पाहत असून रोज ताजा पैसा गोळा करण्यात ते दोन तास घालवत असल्याचे दिसून येत आहे. जुगारा मध्ये हरले की दुःख पचवायला व जिंकले तर जल्लोष साजरा करायला या दारु अड्डयांचा उपयोग केला जातो. परिणामी रस्त्यावरून जाताना हे बेवडे सर्वसामान्य नागरिकांच्या आई माईचा उद्धार करत पोलिसांनाही शिव्या घालत फिरताहेत. जिथं बेवडे पोलिसांच्या नावाने लाखोळी वाहतात तिथे सामान्यांचे काय ? असं म्हणत नागरिक मात्र यांच्या दहशतीखाली येत असल्याचे पहावयास मिळत आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close