देश विदेश

घरगुती गॅस सिलेंडर महागला

नवी दिल्ली – तेल कंपन्यांनी घरगुती गॅसच्या किंमतीमध्ये मोठी वाढ केली असून यापुढे ग्राहकांच्या खिशाला पन्नास रुपयांची झळ पोहोचणार आहे. पाच किलो गॅसच्या किमतीत 18 रुपये वाढ झाली आहे. याबरोबर 19 किलोच्या गॅस सिलेंडर साठी 36.50 रुपये मोजावे लागणार आहेत.

देशातील सर्वात मोठी तेल कंपनी असणाऱ्या आयओसीने दिलेल्या माहितीनुसार आता दिल्लीमध्ये 14.2 किलोचा गॅस सिलिंडर 644 रुपयांना झाला असून तो कोलकात्याने 670.50 रुपये तर मुंबईत 644 रुपयांपर्यंत पोहचला आहे. 660 रुपये चेन्नईमध्ये गॅस सिलिंडरसाठी मोजावे लागत आहेत.
आजची दरवाढ होण्याआधी दिल्लीमध्ये 14.2 किलो गॅस सिलिंडरचे दर 594 रुपये एवढे होते. तर 620.50 रुपये कोलकात्यामध्ये आणि 594 रुपयांना मुंबईमध्ये गॅस सिलिंडर मिळायचा. पण यासाठी आता जास्त पैसे मोजावे लागणार असल्यामुळे सर्वासामान्यांच्या खिशाला या दरवाढीची झळ बसणार आहे. दिल्लीमधील 19 किलोच्या सिलिंडरची किंमत एक हजार 296 रुपये, एक हजार 351 रुपये 50 पैसे कोलकात्यामध्ये, एक हजार 244 रुपये मुंबईमध्ये आणि एक हजार 410 रुपये 50 पैशांपर्यंत चेन्नईमध्ये गेली आहे. गॅस सिलिंडरवर देण्यात येणाऱ्या सबसिडीअंतर्गत केंद्र सरकार प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी 12 गॅस सिलिंडरवर सूट देते. या कालावधीमध्ये ग्राहकांना अधिक सिलिंडर लागले तर ते त्यांना बाजार भावात विकत घ्यावे लागतात.

दर महिन्याला गॅस सिलिंडरच्या किंमतीची तपासणी करुन आंतरराष्ट्रीय दर आणि विदेशातील दरांनुसार तेल कंपन्या गॅस सिलिंडरचे दर निश्चित करत असतात. गॅसच्या किंमती जाणून घेण्यासाठी ग्राहकांना https://iocl.com/Products/IndaneGas.aspx या लिंकला भेट देता येईल. येथे आपल्या शहराचे नाव सिलेक्ट करुन शहरातील गॅसचे दर जाणून घेता येतील.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close