देश विदेश

कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांची सर्वोच्च न्यायालयात धाव

नवी दिल्ली – केंद्र सरकारने लागू केलेले तीन कृषी विधेयक रद्द करण्यात यावी यासाठी शेतकऱ्यांनी आता सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. हे कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे नसून उद्योगपतींच्या हिताचे असल्याच शेतकऱ्यांनी म्हटलं आहे.
गेल्या पंधरवड्यापासून दिल्लीमध्ये शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. कडाक्याच्या थंडीत देखील शेतकरी आपल्या न्याय हक्कांच्या मागणी पासून किंचितही दूर जायला तयार नसल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.विरोधी पक्षातील पाच नेत्यांनी परवाच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली होती आणि कृषि विधेयक रद्द करण्याची मागणी केली. कृषि कायदे तातडीने रद्द करण्यात यावेत, अशी शेतकऱ्यांची आग्रही मागणी आहे. सध्या सरकारने लागू केलेले कृषि कायदे हे उद्योगपतींच्या फायद्याचे असून शेतकरी व सर्वसामान्य जनतेसाठी ही धोक्याची घंटा असल्याचं सांगत शेतकऱ्यांनी आता सर्वोच्च न्यायालयात धाव घेत हा कायदा रद्द करण्यात यावा अशी मागणी केली आहे यावर सर्वोच्च न्यायालय काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे .

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close