आपला जिल्हा

राज्य सरकारचा शासकीय कर्मचाऱ्यांसाठी ड्रेस कोड, जीन्स-टीशर्टला बंदी

मुंबई — सरकारी कर्मचाऱ्यांकडे राज्यशासनाचा प्रतिनिधी म्हणून पाहिले जात असल्यामुळे यापुढे कर्मचाऱ्यांनी कोणते कपडे घालावे यासाठीच्या मार्गदर्शक सूचना राज्य सरकारने जारी केलेल्या आहेत

मंत्रालय आणि मंत्रालयाच्या अखत्यारित येणाऱ्या कार्यालयांमधून राज्य सरकारचा कारभार चालवला जातो, इथे काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्यांकडे शासनाचे प्रतिनिधी म्हणून पाहिलं जातं, म्हणून या कर्मचाऱ्यांचा पेहराव हा कार्यालयाला अनुरूप असणं गरजेचं असल्याचं महाराष्ट्र शासनाने या परिपत्रकात म्हटलंय.
अशा आहेत मार्गदर्शक सूचना —
अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये जीन्स – टी शर्ट घालून येता येणार नाही, सोबतच गडद रंगाचे, चित्र विचित्र नक्षी वा चित्रं असणारे कपडे घालू नयेत असं सांगण्यात आलंय.
महिला कर्मचाऱ्यांनी साडी, सलवार अथवा चुडीदार आणि कुर्ता, ट्राऊझर – शर्ट घालावेत, गरज असल्यास ओढणी घ्यावी, असं या मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटलंय.
शासकीय कर्मचाऱ्यांनी आठवड्यातून एकदा – शुक्रवारी खादीचे कपडे घालावेत, असं सांगण्यात आलंय.
सोबतच ऑफिसमध्ये येताना स्लीपर्स घालू नयेत, चप्पल – सँडल वा शूज घालावेत असंही या सूचनांमध्ये म्हटलंय.
कर्मचाऱ्यांचे कपडे स्वच्छ आणि नीटनेटके असावेत. आणि त्यांनी ओळखपत्र दिसेल असं लावावं अशी सूचना देखील देण्यात आलेली आहे.
शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसोबतच कंत्राटी कर्मचारी आणि सल्लागार म्हणून काम करणाऱ्या सगळ्यांनाच या सूचना लागू करण्यात आले आहेत.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close