देश विदेश

कर्नाटक सरकारकडून 15% मराठा आरक्षणाची घोषणा

बेंगलोर — सरकारी नोकरी आणि शिक्षणात मराठा समाजाला 15 टक्के आरक्षण देण्याची घोषणा कर्नाटक चे मुख्यमंत्री येदुरप्पा यांनी विधानसभेत केली आहे. दुसरीकडे महाराष्ट्रातील मराठा आरक्षणाचा मुद्दा हा न्यायालयाच्या कचाट्यात सापडला आहे.

महाराष्ट्रात आरक्षण मिळावे यासाठी मराठा समाजाने मोठा लढा उभारला . राज्य सरकारने आरक्षण दिले ते देखील न्यायालयाच्या आदेशामुळे रद्द झाले. हा मुद्दा आता न्याय प्रक्रियेत अडकला आहे. दरम्यान शेजारच्या कर्नाटक राज्याने मराठा समाजाला आरक्षण देण्याची ची मोठी घोषणा केली आहे. सध्या मराठा समाजाचा कर्नाटक राज्यात 3 ब प्रवर्गात समावेश आहे. या 3ब प्रवर्गातून मराठा समाजाचा आता समावेश 2 ए प्रवर्गात करण्यात येणार आहे. याबरोबरच जे पाच टक्के आरक्षण होते ते आता वाढवून 15 टक्के करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांनी विधानसभेत स्पष्ट केले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close