राजकीय

शरद पवार होणार यूपीएचे अध्यक्ष ? राष्ट्रवादीने दिलं स्पष्टीकरण

मुंबई — राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार हे यूपीएचे अध्यक्ष होतील, अशी चर्चा आज राजकीय वर्तुळात रंगलेली असतानाच या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसने भूमिका स्पष्ट करत शरद पवार यूपीएच्या अध्यक्ष होण्याबाबत कुठलीही चर्चा झाली नसल्याचं म्हटला आहे.या चर्चैला पूर्ण विराम दिला आहे.

महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने एकत्र येत महाविकास आघाडीच्या माध्यमातून सत्ता स्थापन केली. यातून राज्यात सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपला सत्तेपासून दूर केलं. हा कित्ता केंद्रातही गिरवला जावा आणि भाजपला पुढील काळात सत्तेपासून दूर करावं, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. यासाठी शरद पवार हे यूपीए अध्यक्ष होतील, अशी चर्चा सुरू झाली होती. पण या चर्चैला राष्ट्रवादी काँग्रेसने पूर्णविराम दिला आहे.
यामध्ये तथ्य नाही
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे युपीएचे अध्यक्ष होतील, असं वृत्त माध्यमांमधून दिलं जात आहे. पण या मुद्द्यावर यूपीएतील मित्रपक्षांशी कुठलीही चर्चा झालेली नाही, असं राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मुख्य प्रवक्ते महेश तपसे म्हणाले. माध्यमांमध्ये अशा प्रकारच्या बातम्या जाणीवपूर्वक पसरवल्या गेल्या आहेत. शेतकरी आंदोलनावरून जनतेचं लक्ष वेधण्यासाठी काही जणांकडून हेतूपुरस्सर अशा बातम्या पेरल्या जात आहेत, असं तपसे यांनी स्पष्ट केलं.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close