आरोग्य व शिक्षण

गूढ आजाराची 300 मुलांसह 400 जणांना बाधा; पुण्यातले तज्ज्ञ घेणार शोध

एलुरू (आंध्र प्रदेश) — गेल्या काही दिवसापासून अज्ञात आजाराने आंध्रप्रदेशात डोके वर काढले असून आतापर्यंत या गुढ आजाराची चारशे जणांना लागण झाली आहे. विशेष महत्त्वाची बाब म्हणजे यात 300 मुलांचा समावेश आहे. नेमका हा आजार कोणत्या प्रकारचा आहे याचा शोध पुण्याचे डॉक्टर घेणार आहेत.

आंध्र प्रदेशातील इलूरू या गावांमध्ये या आजाराने हाहाकार उडाला आहे कोरोनाव्हायरस साथीच्या पार्श्वभूमीवर हा आजार एखाद्या साथीच्या रोगासारखा पसरल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे चक्कर येऊन बेशुद्ध पडणे उलट्या होणे अशक्तपणा अशी या आजाराची लक्षणे आहेत.
दरम्यान हा आजार कीटकनाशक किंवा डासांच्या नियंत्रणासाठी फवारण्या येणाऱ्या औषधाच्या एलर्जीने होत असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांत राज्यात कीटकनाशकं म्हणून किंवा डासांच्या नियंत्रणाच्या नावाखाली ऑरगॅनोक्लोरिन  (Organochlorines) वापरल्यामुळे एखाद्याचा मृत्यू झाला का? या दृष्टीने आंध्र प्रदेशमधील अधिकारी तपास करीत आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने या आजाराचं गूढ उकलण्यासाठी एक तज्ज्ञ समिती नेमली आहे. या तीन सदस्यीय समितीमध्ये पुण्यातले विषाणूतज्ज्ञ (Virologist) डॉ. अविनाश देवशटवार यांचा समावेश आहे.
मंत्रालयाने एलुरू आणि आजूबाजूच्या  गावांतील लोकांना झालेल्या या आजाराच्या तपासासाठी तीन सदस्यांची टीम तयार केली आहे. नवी दिल्लीतील एम्समधील (AIIMS) सहयोगी प्राध्यापक डॉ. जमशेद नायर, पुण्याच्या  एनआयव्हीतील (NIV) व्हायरॉलॉजिस्ट डॉ. अविनाश देवशटवार, आणि NCDC चे (नॅशनल सेंटर फॉर डिसीझ कंट्रोलचे ) उपसंचालक डॉ. संकेत कुलकर्णी यांचा समावेश आहे. ही समिती मंगळवारी सकाळी एलूरू येथे पोहोचली.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close