कृषीवार्ता

‘सह्याद्री माझा’च्या वृत्ताची दखल : नंदागौळच्या शेतकऱ्यांच्या फुलगोबीची कृषी पथकाकडुन पाहणी

परळी —  , परळी तालुक्यातील मौजे नंदागौळ येथील एका शेतकऱ्यांनी नर्सरी कडुन फुलगोबीचे रोप खरेदी केली माञ 106 दिवस उलटुनही फुलगोबी आलीच नसल्यामुळे गेल्या आठवड्यात कृषी विभागाकडे नर्सरी विरुध्द तक्रार केली होती. याबरोबरच सह्याद्री माझा ने यासंदर्भात वृत्त छापले होते. शेवटी याची दखल घेऊन आज बुधवारी कृषी विभाग व कृषी विद्यापीड आणी पं.स.चे अधिकारी यांनी प्रत्यक्ष पाहणी केली.

नंदागौळ येथील शेतकरी बालाजी संपत गिते यांनी माजलगाव तालुक्यातील
आलापुर गावातील निसर्ग हायटेक नर्सरीतुन दिंनाक 26/8/2020रोजी धवल फुलगोबी इस्ट वेस्टची 10000 रोपे किंमत 7000रूपये व माधव फुलगोबी युनायटेडची7000 रोपे किंमत 4900रूपये अशी 17000हजार
फुलगोबीची रोपे 11900रूपयांना खरेदी करून आपल्या एका एकराच्यावर शेतात लावली होती.
रोपे लावल्यापासुन 65 ते 70 दिवसात उत्पादन मिळेल असे निसर्ग हायटेक नर्सरीतर्फे सांगण्यात आले होते परंतु 106 दिवस उलटुन गेले तरी फुलगोबीचे उत्पादन निघाले नसुन माझी फसवणुक होवुन आर्थिक नुकसान झाले यासाठी निसर्ग हायटेक नर्सरीकडुन मला नुकसान भरपाई मिळावी व विनाउत्पान देणारी रोपे विक्री प्रकरणी कारवाई करावी अशी मागणी नंदागौळचे शेतकरी बालाजी संपती गिते यांनीपरळीच्या गटविकास अधिकारी यांच्या कडे लेखी निवेदन दिले होते.
कृषी विद्यापीठाचे अधिकारी एन.ए.जोशी,परळी कृषी अधिकारी ए.ए.सोनवणे,प.स.चे कृषी अधिकारी कांदे इस्ट वेस्ट सिड,युनाटेड जनेटिक इंडिया या कंपनीचे पंकज गावंडे ,संभाजी मडोळे यांनी फुलगोबीच्या फ्लाॕटची पाहणी केली असुन याचा अहवाल दोन दिवसात दिल्या जाईल असे सांगितले. यावेळी फळभाग लागवड शेतकरी बालाजी संपत्ती गित्ते, सेवा निवृत्त नर्सिंग गित्ते, राजभाऊ जगताप, नर्सिंग पटलोबा गित्ते , संदीप रमेश गित्ते, राहुल भास्कर गित्ते , व्यंकटी परमेश्वर गित्ते, राजेभाऊ जगताप, शंकर फड , नरहरी मुंजाजी गित्ते , दासू गित्ते, वैजनाथ गित्ते, रामकिशन गित्ते, महेश गित्ते, विष्णु गित्ते, कृष्णा गित्ते, शशी गित्ते आदी शेतकरी उपस्थित होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close