देश विदेश

आठ शतकानंतर आकाशात होणार ‘ख्रिसमस स्टार’चे दर्शन

मुंबई — आठशे वर्षाच्या प्रदीर्घ कालखंडानंतर यावर्षी 21 डिसेंबर रोजी सूर्यास्तानंतर क्रिसमस स्टार चे दर्शन अवकाशात होणार आहे. गुरु आणि शनि हे दोन्ही ग्रह हे एका रेषेमध्ये आल्यामुळे आकाशात दुहेरी चांदनी दिसणार आहे. आकाश निरभ्र असेल तर जगात कोठेही ख्रिसमस स्टार चे दर्शन खगोलप्रेमींना होणार आठ शतकानंतर आकाशात होणार ‘ख्रिसमस स्टार’चे दर्शनआहे. आकाशात दुर्मिळ खगोलिय स्थितीमुळे जी दुहेरी चांदणी दिसणार आहे तिला स्टार ऑफ बेथलेम असेही म्हणतात

उन्हाळ्याच्या सुरुवातीपासूनच हे दोन्ही ग्रह एकमेकांच्या दिशेने सरकण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, 21तारखेच्या रात्री ते एकमेकांसमोर येतील. त्यामुळे दोन्ही ग्रह एकाच मोठ्या ताऱ्यासारखे दिसतील. त्यांचा आकार पौर्णिमेच्या पूर्णाकृती चंद्राच्या 1/5 असेल, अशी माहिती ह्युस्टनच्या राईस विद्यापीठातील भौतिकशास्त्र आणि खगोलशास्त्राचे प्राध्यापक पॅट्रीक हार्टिगन यांनी दिली आहे.
अशीच स्थिती या आधी 800 वर्षांपूर्वी 4 मार्च 1226 रोजी आकाशात पाहावयास मिळाली होती. या वर्षी ‘ख्रिसमस स्टार पाहण्याची संधी हुकली तर त्यासाठी 15 मार्च 2080 पर्यंत वाट पाहावी लागेल, असेही प्रा. हार्टिगन यांनी सांगितले.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close