क्राईम

वाळूचे ट्रॅक्टर सोडण्यासाठी 30 हजाराची लाच घेताना तहसीलदार पकडला

बीड — वाळू च्या माध्यमातून महसूल विभाग राजरोस कमाई करत असल्याचं झाला आहे स्पष्ट झाला आहे .वडवणीच्या तहसीलदाराने अवैध वाळू वाहतूक करताना पकडलेला ट्रॅक्टर सोडण्यासाठी 30 हजार रुपयांची लाच स्वीकारताना तहसीलदार, तलाठी व कोतवाल यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून बुधवारी रंगेहात पकडले आहे.

वडवणीचा तहसीलदार श्रीकिसन देवराव सांगळे, तलाठी धुराजी कचरू शेजाळ व कोतवाल बाळू आनंत बिडवे अशी लाचखोरांची नावे आहेत. याबाबत सविस्तर माहिती अशी आहे की, बुधवारी वडवणी जवळील वाळू पट्टया मधून एक ट्रॅक्टर अवैध वाळू वाहतूक करत होते. हे ट्रॅक्टर तहसीलदारांनी आडवले त्यानंतर तहसीलदारांनी वाळू माफिया बरोबर तडजोड केली. यामध्ये अधिकाऱ्यांनी 30 हजार रुपयांची मागणी केली. दरम्यानच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी तक्रारदाराच्या तक्रारीवरून सापळा रचला होता. स्वतः तलाठी व कोतवाल हे तिघेही लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. त्यामुळे बीड जिल्ह्यातील महसुल विभागाची लक्तरे वेशीला टांगली आहेत. एकदा महसूल विभागातील काही अधिकारी यांच्या हेतूवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ही कारवाई बुधवारी वडवणी शहरात करण्यात आली. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक बाळकृष्ण हनपुडे पाटील यांच्या टीमने केली.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close