क्राईम

धारुरमध्ये नकली नोटांचे रॕकेट पकडले; औरंगाबाद पोलिसांची कारवाई

बीड– धारूर शहरातील हनुमान चौकात असलेल्या एका ग्राहक सेवा केंद्रावर औरंगाबाद सिडको पोलिसांनी छापा टाकून नकली नोटा चलनात आणणाऱ्या रॅकेट चा बुधवारी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी एकाला नकली नोटा सह ताब्यात घेतले असल्याचे पोलिसांनी सांगितले.

याबाबत अधिक माहिती अशी की, औरंगाबाद टि.व्ही सेंटर भागामध्ये दोन संशयित आरोपी नकली नोटा चलनात आणत असल्याच्या माहिती वरुन संदीप आरगडे व निखिल संबेराव या दोघांना ( रा. बेगमपेठ औरंगाबाद) पोलिसांनी ताब्यात घेतले. दोघाकडून दिड लाख रुपयांच्या बनावट नोटा हस्तगत केल्या आहेत. आरोपीनी दिलेल्या माहितीवरुन मुख्य आरोपी आकाश संपती माने धारुर यास सिडको औरंगाबाद गुन्हे अन्वेषण पथकाने धारुर येथे छापा मारुन बुधवारी अकराला ताब्यात घेतले. यावेळी काही बनावट नोटा व छपाईचे साहित्य आढळून आले.

पोलिसांनी आकाश व आढलेल्या नोटा, छपाई प्रिंटर व संगणक ताब्यात घेवून औरंगाबाद कडे रवाना झाले आहे. पथकात पो.उपनिरिक्षक बाळासाहेब आहेर यांच्यासह पो.हे.कॉ. नरसिंग पवार, दिनेश बन, सुभाष शेवाळे, प्रकाश डोंगरे, विशाल सोणवने, गणेश नागरे, सुरेश भिसे, स्वप्नील रत्नपारखी यांचा समावेश आहे.

अनेक महिन्यांपासून सुरू होते रॅकेट-

गेल्या अनेक दिवसांपासून बाजारात नकली नोटा आढळून येत असल्याच्या तक्रारी होत्या. मात्र अधिकृत तक्रार नसल्याने कुठलीही कारवाई होत नव्हती. आज मात्र बाहेरुन आलेल्या पोलीसांनी गुप्त माहितीच्या आधारे हनुमान चौकात एका बँक ग्राहक केंद्र, झेरॉक्स सेंटरवर छापा टाकला. यात २०० रु.च्या नकली नोटां आढळून आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close