देश विदेश

कृषी कायदे विरोधात पुकारलेल्या भारत बंदला प्रचंड प्रतिसाद

नवी दिल्ली — केंद्र सरकारने तीन कृषीविषयक कायदे लागू केले असून हे कायदे शेतकरी विरोधी असल्याचे सांगत कायदे मागे घ्यावे या मागणीसाठी शेतकरी संघटनांच्या वतीने पुकारण्यात आलेल्या भारत बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना या पक्षांनी देखील बंदला पाठिंबा दिला आहे.


शेती विषयक कायदे मागे घ्यावे यासाठी पंजाब हरियाणातील शेतकरी दिल्लीमध्ये आंदोलन करत आहेत. केंद्र सरकारने आतापर्यंत पाच वेळा शेतकरी नेत्यांसमवेत बैठका घेतल्या मात्र त्यातून कोणताही तोडगा निघू शकलेला नाही. दरम्यान सुरुवातीलाच आठ डिसेंबर रोजी बंदची हाक देण्यात आली होती. केंद्र सरकार आता शेतकरी नेत्यांशी 9 डिसेंबर रोजी पुन्हा एकदा चर्चा करणार आहे. दरम्यान शेतकरी संघटनानी मंगळवारी पुकारलेल्या भारत बंदला विविध कामगार, व्यापारी संघटना तसेच अन्य क्षेत्रातील संघटनांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. सिंघू बॉर्डरवर मंगळवारी सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत चक्का जाम आंदोलन सूरू केले आहे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी याठिकाणी जाऊन नुकताच शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला होता. काँग्रेसचे राहुल गांधी, सपा नेते अखिलेश यादव, तृणमूल नेत्या ममता बॅनर्जी, टीआरएसचे के. चंद्रशेखर राव, राष्ट्रवादीचे शरद पवार, बसपच्या मायावती आदी नेत्यांनीही शेतकऱ्यांच्या मागणीचे समर्थन करत केंद्र सरकारवर टीका केली आहे. शेतकऱ्यांच्या या बंदला
ज्या राजकीय पक्षांनी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे, त्यात काँग्रेस, माकप, भाकप, द्रमुक, राजद, राष्ट्रवादी काँग्रेस, झारखंड मुक्ती मोर्चा, सपा, शिवसेना, अकाली दल, भाकप-एमएल, गुपकार ग्रुप, तृणमूल, टीआरएस, एमआयएम, आप, बीव्हीए, पीडब्ल्यूपी, आरएसपी, फॉरवर्ड ब्लॉक, एसयूसीआय (सी), स्वराज्य इंडिया, जनता दल (एस) आणि बसपा यांचा समावेश आहे. दरम्यान भारत बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून महाराष्ट्रात देखील त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. अनेक ठिकाणी शेतकरी रस्त्यावर उतरल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close