आपला जिल्हा

नव्या पिढीसाठी अभिप्रेत व विश्वासु नेतृत्व माजीमंत्री जयदत्तअण्णा क्षीरसागर ■-■-प्रशांत सुलाखे

प्रशांत सुलाखे —

सर्व सामान्य जनता ही अतिशय सुज्ञ असते केवळ मतदानापूरते नव्हे तर कायमपने आपल्या सभोवती घडणा-या घटना आणि त्यातही राजकारणाकडे आणि त्याच्या होणा-या परिणामाकडे त्यांचे लक्ष असते ,म्हणून लाटामधेही काही नेते हे आपल्या व्यक्तिमत्वाने आणि कर्तृत्वाने ठामपने टिकून राहतात ,कारण त्यांची कार्य तत्परता ही अविरत असते ,आपल्या जीवनाचा किंवा आयुष्याचा बहुतेक क्षण ते सर्व सामान्याच्या सुखदुःखाचा विचार आणि त्यादृष्टीने कृती करण्यासाठी व्यतीत करतात आणि म्हणूनच अशा नेत्याकडून विकासाची मोठी आणि कायमस्वरुपी कामे उभी राहतात हे सर्व वर्णन लोकनेते जयदत्त क्षीरसागर यांना तंतोतत लागू पडते ,आई कडून जरी त्यांनी राजकारणाचे आणि नेतृत्वाचे बाळकडू घेतले असले तरी त्यापूढे जावून त्यांनी जनसेवेचा वसा पूढे चालवताना नव्या पिढीला अभिप्रेत असे नवे आणि धडाडीचे रुप दिलेले आहे ,मंत्री म्हणून ,लोकप्रतिनिधि म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे ,विद्यमान परिस्थितित राज्यस्तरीय नेतृत्व म्हणूनच त्यांच्याकडे सर्वसामान्य जनतेचे लक्ष आहे आणि हा नेता आपल्यासाठी भरीव कार्य करु शकतो असा विश्वासही आहे

बीड जिल्हा हा व्यक्तिनिष्ठ राजकारणाच्या पाठीशी सतत उभा असतो हे आतापर्यतच्या सर्व निवडणूका मधील निकालावरुन आपल्या लक्षात येते ,स्व केशरकाकू यांच्या नेतृत्वाचा उदय झाला आणि एक स्त्री बीड जिल्ह्याचे नेतृत्व दिल्लीत करु लागली ही जिल्ह्यासाठी अभिमानाची व भूषणाची बाब होती ,जिल्ह्यात अधिक काळापर्यत नेतृत्व असल्याचे काकूनी सिद्ध केले ,त्यांच्या कार्यात आणि त्यांंच्या बोटाला धरुनच त्यांचे जेष्ठ पूत्र जयदत्त आण्णाही राजकारणात सक्रिय झाले ,बीड जिल्यात शैक्षणिक दृष्ट्या सर्वात प्रथम ग्रामिण भागात संस्थेच्या माध्यमातून मूला मूलीना शिक्षण मिळाले पाहीजे ही धारणा काकूनी प्रथम अवलंबली आणि पाहता पाहता शैक्षणिक जाळे विणले गेले ,यामाध्यमातून शेकडो युवकांना आजही काकूच्या या कार्याचा लाभ मिळतो आहे ,राज्य आणि केन्द्र सरकारकडून बीड जिल्यासाठी जे जे करता येईल त्या मार्गाने विकासाची कामे खेचून आणली आहेत ,विधानसभा निवडणूकामधे मा जयदत्त क्षीरसागर यांना संधी देवून विकासाचा रथ पूढे नेण्यासाठी काकूनी मतदार संघातील सगळ्या जाणत्या व जवळच्या लोकांना एक विश्वास दिला आहे ,आण्णानीही या संधीचे सोने करण्यासाठी तळमळीने कार्य हाती घेतले ,जे करायचे ते पूर्ण पने नियोजन करुनच करायचे आणि ते झालेच पाहीजे यासाठी स्वकिय असो कि परकिय असो त्यांच्या माध्यमातून हाती घेतलेले काम तडीस न्यायचे ही त्यांची जमेची बाजू बीड जिल्ह्यासाठी फायद्याचीच ठरली ,एक आमदार ,मंत्री म्हणून आण्णांनी महत्वाची कामे हाती घेतली,सत्ता असो कि नसो त्यांनी आपले कार्य कधी खंडीत ठेवले नाही म्हणूनच प्रत्यकाला या नेतृत्वाबाबत खात्री आणि अपेक्षा राहीली आहे ,नव्या पिढीला काय हवे ,भविष्यात दिर्घकालीन टिकणा-या योजना कोनत्या ,प्रत्येक योजनेतून जनतेतील शेवटच्या घटकाला मिळणारा लाभ या सा-या बाबी तपासूनच आण्णांनी एक ना अनेक प्रस्ताव दाखल करुन ते मंजूर आणले ,म्हणूनच आजही ग्रामिण भागातील मतदार एक सक्षम नेतृत्व म्हणूनच आण्णाकडे पहातो ,तिर्थ क्षेत्र विकास,रस्ते वीज पाणी आदी मुलभूत गरजा लक्षात घेवून आपल्या आमदार फंडातून कामे करुनच दाखवली ,जी राहीली त्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजना ,नगरोत्थान ,पेयजल ,अमृत योजना ,पंतप्रधान ग्रामसडक योजना ,डिपीडीसी ,अशा अनेक मार्गाने शेकडो प्रस्ताव मंजूर करुन घेवून कामचा धडाका सुरु ठेवला ,आजही ग्रामिण भागात विकासाची केलेली कामे डौलदारपने उभि आहेत ,

बीड जिल्ह्यात आज जेष्ठ नेतृत्व म्हणून त्यांच्याकडेच पाहीले जाते ,स्व गोपीनाथराव मुंडे यांच्या नंतर आता आण्णाकडेच ही मोठी जबाबदारी आहे म्हणूनच पक्ष विरहीत लोकही आण्णांना मानतात ,काही दिवसापूर्वीच बीड शहसासाठी अमृत पेयजल योजना आणि भूयारी गटारी योजना या ३१८ कोटीच्या योजना सत्ता नसतानाही खेचून आणने ही नेतृत्वाची कमाल त्यांच्या प्रयत्नातून दिसून आली आहे ,बायपासचेही काम त्यांनी दिल्लीपर्यत जावून करुनच घेतले आहे ,आता उर्वरीत कामाच्या पूर्तीसाठी त्यांची मंत्रालयातील कामाची गती वाढती आहे तीही कामे थोड्याच दिवसात बीडकरांना प्रत्यक्ष साकारलेली दिसतील ,शासनाच्या प्रत्येक योजना बीडसाठी राबवन्याकरता आण्णा सतत प्रयत्नशील असतात हे त्यांच्या प्रत्येक भाषणातून आणि कृतीतून दिसते आहे म्हणूनच नवी पिढी देखील त्यांच्यावरच विश्वास ठेवून आहे

अशा या लोकनेत्याचा आज 70 वा वाढदिवस आहे त्यांना लक्ष लक्ष शुभेच्छा !

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close