क्राईम

चौसाळ्यात ट्रकच्या धडकेत एक ठार एक गंभीर जखमी

बीड — भरधाव वेगाने जात असलेल्या ट्रकने मोटारसायकलला जोराची धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात एक जणांचा मृत्यू झाला असून दुसरा गंभीर जखमी झाला आहे.सोलापूर महामार्गावर चौसाळा बायपास जवळ रात्री घडली


याबाबत अधिक माहिती अशी की नामदेव बाबुराव मस्के वय 40 वर्ष रा. गोलंग्री व वाल्मीक खवले वय 35 वर्ष रा. कानडी घाट हे दोघेजण मोटारसायकल क्र.एमएच-20 सीके-9382 ने चौसाळा येथे येत असताना. महामार्गावरील बायपासवर भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रक क्र एचआर-56 बी-2344 ने जोराची धडक दिली. या धडकेत नामदेव मस्के याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.वाल्मीक खवले गंभीर रित्या जखमी झाले असून महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमी स बीड जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठविले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close