क्राईम

आठ हजार रुपयांची लाच घेणारा बांधकाम उपअभियंता एसीबीने पकडला

बीड — स्मशानभूमीच्या सौंदर्यीकरणाचे काम पूर्ण केल्यानंतर मोजमाप पुस्तका सही करण्यासाठी आठ हजार रुपयांची लाच घेताना जि. प.बांधकाम विभागाचे उपअभियंत्यास राहत्या घरी रंगेहाथ पकडले. ही कारवाई शनिवार दि. 15 डिसेंबर रोजी रात्री आठच्या सुमारास केली. या कारवाईने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या माजलगाव उप विभागाचा प्रभारी उप अभियंता नामदेव रामकिसन बहिर यांने ठेकेदारास मोजमाप पुस्तिके वर सही करण्यासाठी बारा हजार रुपयाची लाच मागितली होती. ठेकेदाराने तालखेड येथील स्मशानभूमी सौंदर्यीकरणांतर्गत शेड व शेड निवारा तयार करण्याचे काम पूर्ण केले होते. याचे बिल काढण्यासाठी मोजमा पुस्तिकेवर प्रभारी उपअभियंता असलेल्या नामदेव बहिर याची सही आवश्यक होती. याप्रकरणी लाचेची मागणी होत असल्याकारणाने ठेकेदारांने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर प्रकरणाची शहानिशा करण्यात आली. तडजोडी अंती बहिर यांने आठ हजार रुपये घेण्यास संमती दर्शविली. ही ठरलेली रक्कम स्वीकारताना संत तुकाराम नगर राजीव गांधी चौक बीड याठिकाणी असलेल्या त्याच्या निवासस्थानी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या टीमने रंगेहात पकडले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक बाळकृष्ण हानपुडे व त्यांच्या टीमने केली.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close