देश विदेश

संघाशी संलग्न असलेल्या स्वदेशी जागरण मंच ने दिला शेतकरी आंदोलनाला पाठिंबा

नवी दिल्ली — मागील काही दिवसापासून दिल्लीत सुरू असलेल्या शेतकर्‍यांच्या आंदोलनाला आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न असलेल्या स्वदेशी जागरण मंचने सुद्धा पाठिंबा दर्शविला आहे. ही बाब मोदी सरकार साठी धक्कादायक मानली जात आहे.
केंद्र सरकारने नवीन कृषी कायदे लागू केल्यामुळे शेतकऱ्यांनी दिल्लीत जाऊन आंदोलन सुरू केले आहे. शेतकरी किंचितही मागे हटण्यास तयार नसल्यामुळे मोदी सरकारची मोठी कोंडी निर्माण झाली आहे. अशा स्थितीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडीत असलेल्या स्वदेशी जागरण मंचने देखील या कायद्याविरोधात भूमिका घेतली असल्यामुळे मोदी सरकार पुढील अडचणीत वाढ झाली आहे.पंजाब – हरियाणा तसेच दिल्ली लगतच्या राज्यांसह देशभरात नवीन कृषी कायद्याविरोधात जनभावना तीव्र होत चालली असताना स्वदेशी जागरण मंचाने ही भूमिका मांडली आहे.

स्वदेशी जागरण मंचाच्या अश्विनी महाजन यांनी म्हटले आहे की, कृषी विधेयकांमध्ये सुधारणा करण्यास वाव आहे. सरकारने शेतकर्‍यांना किमान आधारभूत किंमतीला धक्का बसणार नाही, याचे ठोस आश्वासन दिले पाहिजे. त्यासाठी सरकारने कृषी विधेयकात बदल करावा अथवा नवीन कायदा पारित करावा.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close