महाराष्ट्र

धुळे-सोलापुर राष्ट्रीय महामार्गावर वर्षभरातच भेगा

केंद्रीय मंत्री नितिन गडकरींना तक्रार, रास्ता रोकोचा डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांचा इशारा


बीड — राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५२ धुळे ते सोलापूर अत्यंत निकृष्ट दर्जाचा झाला असून वर्षभरातच केलेल्या सिमेंट कामाला गवारी फाट्याजवळ भेगा पडल्या आहेत तर सध्या नेकनुर मधील रस्त्याच्या कामात मातीमिश्रित आणि चिखलाच्या मुरूमाचा थर देताना दिसत आहे, पाणी मारण्याच्या अत्यल्प प्रमाणामुळे मोठ्या प्रमाणावर धुळीचे लोट ऊठल्याने वाहतूक करणे जिकिरीचे काम झाले आहे.


एचपीएम कंपनीचे व्यवस्थापक निवृत्ती शिंदे यांना सामाजिक कार्यकर्ते, नागरीकांनी वारंवार समजावून देखील हेतुपुरस्सकर दुर्लक्ष केले जात आहे, त्यामुळेच रस्तेकामाची गुणनियंत्रक विभागामार्फत चौकशी करण्यात यावी आणि निकृष्ट दर्जाच्या कामातील जबाबदार ठेकेदार आणि शासकीय अभियंता यांच्यावर कारवाई करण्यात यावी यासाठी डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली दि. २८ डिसेंबर २०२० वार सोमवार रोजी सकाळी ११ वाजता गवारी फाटा येथे भेगा पडलेल्या ठिकाणी राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्याचा ईशारा जिल्हाप्रशासनाला दिला आहे

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close