आपला जिल्हा

बहिरवाडी शिवारात दोन एकर ऊस शॉर्टसर्किटने जळून खाक

बीड- बीड तालुक्यातील बहिरवाडी शिवारात दोन एकर उसाच्या फडाला शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची घटना बुधवारी दुपारी दोन वाजता घडली. या आगीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून महावितरण विभागाच्या गलथान कारभारामुळे अशाप्रकारे शेतकऱ्यांच्या ऊसाला आगी लागण्याच्या घटना बीड जिल्ह्यात घडू लागल्या आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी आहे की, विनोद शेषराव साळुंखे यांची बीड तालुक्यातील बहिरवाडी शिवारात जमीन आहे. त्यांचा तेथे दोन एकर ऊसाचा फडास बुधवारी दुपारी दोन वाजता अचानक आग लागली . उसाच्या फडाच्या बाजूने गेलेल्या विद्युत तारे मुळे शॉर्टसर्किट झाल्याने उसाने पेट घेतला . जेव्हा आग लागली तेव्हा उसाच्या फडात जवळ कोणीच नव्हते. त्यामुळे आगीने उग्ररूप धारण करत अख्खा उसाचा फडच आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. यामुळे शेतकरी विनोद साळुंखे यांचे प्रचंड नुकसान झाले असून बीड जिल्ह्यात मागील काही दिवसापासून ऊसाच्या फाडाला आग लागण्याच्या छोट्या-मोठ्या घटना सातत्याने घडत आहेत. ग्रामीण भागामध्ये अनेक ठिकाणी विद्युत तारा जमिनीलगत लोंबकळत असलेले चित्र पाहायला मिळते. विद्युत तारा ताणून घेतल्या तर अशाप्रकारे शॉर्टसर्किट होण्याचे प्रमाण कमी होईल. मात्र महावितरण विभागाच्या गलथान कारभारामुळे शेतकऱ्यांच्या उसाचे मोठे नुकसान होत असून तात्काळ नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेषराव साळुंके यांनी केली आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close