महाराष्ट्र

एक गाव, एक दिवस’ उपक्रमात ग्राहकाभिमुख सेवा 708 गावात पोहचलीवीज बिलाच्या 3,804 तक्रारी सोडविल्या 

उपक्रमात 7,834 कर्मचा—यांचा  सहभाग

औरंगाबाद —   ग्रामीण भागात  ‘एक गाव, एक दिवस’ आणि शहरी भागात ‘एक वार्ड एक दिवस’ उपक्रमात वीज ग्राहकांना केंद्रबिंदु समजून त्यांना दर्जेदार व सुरळित वीज पुरवठा करण्या बरोबरच येथील वीज समस्या एका दिवसात जागेवरच निपटारा करण्यात येत आहेत. या उपक्रमात गेल्या वीस दिवसात  मराठवाडयात अभियंते, कर्मचारी, जनमित्र व बाहयस्त्रोत्त 7,834 कर्मचा—यांनी 3,804 वीज बिलांच्या तक्रारींचा निपटारा केला. नवीन वीज जोडण्या देणे,  विघुत वाहिनी व पोल सरळ करणे,अनधिक्रत विजेच्या आकडे काढणे यासह 8,684 वीज ग्राहकांकडून 97,22,696 रूपये वीज बिलाची वसूली केली आहे. मराठवाडयात 708 गावात महावितरणची सेवा पोहचली आहे.

   महावितरणची सेवा अधिकाधिक लोकाभिमुख होण्यासाठी अभियंते व कर्मचा—यांनी   महावितरण औरंगाबाद प्रादेशिक कार्यालय अंतर्गत औरंगाबाद, लातूर व नांदेड परिमंडलातील ग्रामीण भागात ‘एक गाव, एक दिवस’ आणि शहरी भागात ‘एक वार्ड एक दिवस’ उपक्रम राबवून  महावितरण कर्मचा—यांच्या पथकामार्फत   तेथील विजेच्या समस्या जाणून घेवून त्याचे  निराकरण त्याच दिवशी करण्याचे निर्देश सहव्यवस्थापकीय संचालक  डॉ नरेश गिते यांनी दिले होते. त्यानुसार मराठवाडयात औरंगाबाद प्रादेशिक कार्यालया अंतर्गत औरंगाबाद परिमंडलात 252 गाव, लातूर परिमंडलात 94 व नांदेड परिमंडलात 362 गावात असे एकूण 708 गावात महावितरणची सेवा पोहचली आहे. हा उपक्रम अजूनही यापुढे चालू राहणार आहे.

या उपक्रमात लघुदाब 4,863 वाहिण्या दुरूस्त केल्या. लघुदाब 1,454 पोल व उच्चदाब 740 पोल सरळ केले. लोबंकळलेल्या लघुदाब 2,885 व उच्चदाब 1,051 तारा सरळ केल्या. रोहित्राचे 1,006 बॉक्स दुरूस्त केले. रोहित्राचे 791 केबल बदलण्यात आले. रोहित्रांना 249 नवीन आर्थिंग केले. वाकलेले 259 पोल बदलले. पोलला दिलेले 300 स्टे बदलले. सिंगल फेज  व थ्री फेज जळालेले, नादुस्त व बंद पडलेले 1,406 मिटर बदलले. सिंगल फेज  व थ्री फेज 2,042 वीज मिटर घराच्या बाहेर बसविले. वीज देयकाच्या 3,804 तक्रारी जागेवरच सोडविल्या. सिंगल फेज व थ्री फेज 1,030 नवीन जोडण्या दिल्या. नादुरूस्त झालेल्या 944 सरव्हिस वायर बदलले. अंगणवाडी व प्राथमिक 67  शाळांना नवीन वीज जोडण्या दिल्या. मोबाईल अॅप व आॅनलाईन देयक भरणा कसे भरावे, याचे 827 ग्राहकांना प्रशिक्षण दिले. अनधिक्रत 1,723 विजेचे आकडे काढले. व 8,684 वीज ग्राहकांकडून 97,22,696 रूपये वीज बिलाची वसूली केली.

महावितरणतर्फे वेबिनारद्वारेही ग्राहकांना बिले समजावून सांगण्यात आली आहेत. उपविभाग व विभाग पातळीवर अधिकारी-कर्मचाऱ्यांची पथके स्थापन करण्यात आली आहेत. या पथकांकडून वीज ग्राहकांना फोनवरून लॉकडाऊन कालावधीतील बिल समजावून सांगण्यात येत आहेत.ग्राहकांना आपला ग्राहक क्रमांक नमूद करून https://billcal.mahadiscom.in/consumerbill/ या लिंकवर वीजबिल पडताळून पाहता येईल. वीज ग्राहकांनी चालू वीज बिलासह थकबाकीचा भरणा करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close