आपला जिल्हा

गोदावरी पात्रात टाकलेली मोटार दुरुस्त करतांना विजेचा धक्का लागून एकाचा मृत्यू

माजलगाव — शेतीला पाणी देण्यासाठी गोदावरी नदी पात्रात बसवलेली विद्युत मोटार बिघडली. ती दुरुस्त करण्यासाठी गेलेल्या तीस वर्षीय शेत मजुराचा करंट लागून मृत्यू झाल्याची घटना मोगरा येथे घडली.
मोगरा येथील गजानन मारुतीराव शिंदे हा तीस वर्षाचा युवक गोदावरी नदी पात्रात शेतीला पाणी देण्यासाठी बिघडलेली विद्युत मोटार दुरुस्त करण्यासाठी गेला होता. मात्र दुपारी दिडच्या सुमारास मोटार बाहेर काढत असतांना अचानक त्याला विजेचा धक्का बसला. यातच त्याचा मृत्यू झाला. या शेतमजुराच्या पश्चात दोन मुले, पत्नी भाऊ व वडील असा परिवार आहे घरातील कर्ता पुरुष गेल्यामुळे शिंदे परीवाराबद्दल परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close