आपला जिल्हा

परळीच्या डॉ. तुषार पिंपळे यांचे मोटार सायकल वरून १२ दिवसात कन्याकुमारी ते काश्मीर भारत भ्रमण

    • ७ हजार किमी प्रवास करून परतल्यावर परळीत जंगी स्वागत

परळी  —-  परळी येथील सुपरिचित डॉक्टर व हौशी बाईक रायडर म्हणून ओळख असलेले डॉ. तुषार पिंपळे यांनी आपल्या मोटर सायकलवरून केवळ १२ दिवसात ७००० किलोमीटर प्रवास पूर्ण करून कन्याकुमारी ते रोहतांग पास अटल टनेल असे भारत भ्रमण करण्याचा विक्रम केला आहे . तेआज परळीत परतले आहेत.

दि. १८ नोव्हेम्बर ला परळीतून प्रवासासाठी निघून के टू के (कन्याकुमारी ते काश्मीर ) असा ७००० किमीचा प्रवास करून परळीत परतल्यानंतर आज डॉ. पिंपळे यांच्या कुटुंब व मित्र परिवाराने परळीत त्यांचे जंगी स्वागत केले.

कोरोनाच्या भीतीने एकीकडे लोक घराबाहेर पडायला घाबरत आहेत, अशा काळात हौशी बाईक रायडर असलेल्या डॉ. तुषार यांनी भारत देश पालथा घालण्याचे ते आव्हान स्वीकारत आपल्या हरली डेव्हीडसन ( HARLEY DAVIDSON FAT BOB..) 1600cc या आवडत्या बाईक वरून हे भारत भ्रमण पूर्ण केले आहे.

डॉ. तुषार पिंपळे यांनी दररोज साधारण ८०० किलोमीटर इतका प्रवास केला. १८ तारखेला परळी येथून निघून, बीड, सोलापूर, बेंगलोर, कन्याकुमारी परत बेंगलोर, हैद्राबाद, नागपूर, आग्रा, ग्वाल्हेर, चंदिगढ, मनाली, रोहतांग, अटल टनेल, परत चंदिगढ, जयपूर, इंदोर, धुळे, औरंगाबाद आणि शेवटी आज परत परळी असा १२ दिवस प्रवास करत डॉ. पिंपळे यांनी भारत भ्रमण पूर्ण केले.

त्यांनी १२ दिवसात परळी ते कन्याकुमारी, कन्याकुमारी ते
मनाली,अटल टनेल
जगातील सर्वात उंचीवर दहा हजार फूट उंचीवर,आणि सर्वात लांब ( 9.4.,kms ) असलेले
आणि मनाली ते परळी,
असे संपूर्णभारत भ्रमण
भारत माते च्या पदकमला पासून ते मुकुट पर्यंतचा प्रवास केला.

डॉ. तुषार पिंपळे परळी शहरातील नामांकित डॉक्टर असून त्यांना बाईक रायडिंग ची आवड आहे. आपला छंद जोपासण्यासाठी ते नेहमी विविध बाईक स्पर्धा, बाईक सफर आदींमध्ये सहभागी होत असतात. आज १२ दिवसांनी भारत भ्रमण करून परत आल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांसह मित्रपरिवाराने परळीत त्यांचे जोरदार स्वागत केले यावेळी श्री. जयप्रकाशजी काबरा, प्रशांत जोशी, डॉ श्रीगोपाल झंवर, डॉ अशोक लोढा, डॉ विश्वास भायेकर, मुकेश काबरा, दत्तात्रय गुट्टे, संजय आघाव, बालासाहेब गित्ते, रवींद्र देशमुख, महिला कॉलेज चे प्रोफेसर विलास देशपांडे, विकास देशपांडे ,वसंत फड, संतोष चौधरी, सरस्वती विद्यालयाचे मुख्याध्यापक मिसाळ सर आदी उपस्थित होते.

डॉ. तुषार पिंपळे यांच्या या भारत भ्रमणाबद्दल पालकमंत्री धनंजय मुंडे यांनीही त्यांचे अभिनंदन केले असून त्यांच्या या अनोख्या प्रवासाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close