क्राईम

महिलेचा जळालेला मृतदेह पोखरी शिवारात आढळला

अंबाजोगाई — अंबाजोगाई जवळील पोखरी शिवारात सोमवारी दुपारी ५५ वर्षीय महिलेचा मृतदेह सोयाबीनच्या ढिगार्‍याजवळ जळालेल्या अवस्थेत आढळून आला आहे. याबरोबरच शेजारी असलेला सोयाबीन चा ढिगारा देखील जळून खाक झालेला या घटनेमुळे खळबळ माजली असून ही आत्महत्या कि हत्या या विषयी तर्कवितर्कांना उधान आले आहे.
काशीबाई विष्णू निकम ही 55 वर्षीय महिलेचे सासर परळी तालुक्यातील नागपिंपरी आहे. लग्नानंतर काही दिवसातच काशीबाई माहेरी निघून आली आणि स्थायिक झाली. पोखरी येथे मागील चार दिवसांपासून सप्ताह सुरू होता. रविवारी रात्री काशीबाईने सप्ताहाची पंगत दिली. सर्व वारकरी भोजन करून गेल्यानंतर ही महिला घरात दिसून आली नाही. पंगत दिल्यानंतर ती बेपत्ता झाल्याचे शेजार्‍यांनी सांगितले. सोमवारी सकाळी सायगाव ते गित्ता या शिवरस्त्यावर असलेल्या दत्तमंदिर परिसरातील शेतात सोयाबीनच्या ढिगार्‍याजवळ या महिलेचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. शेतात गेलेल्या शेतकर्‍याच्या निदर्शनास हा प्रकार आला. त्यांनी तात्काळ या घटनेची माहिती पोलीसांनी दिली. त्यांनतर ग्रामीण ठाण्याचे निरिक्षक महादेव राऊत यांनी घटनास्थळी धाव घेत महिलेची ओळख पटविली. दरम्यान, मृतदेहाची अवस्था पाहता या महिलेने आत्महत्या केली की तिचा खून झाला किंवा अपघात याच तपास पोलीस करत आहेत. मृतदेहाची अवस्था अतिशय वाईट असल्याने जागेवरच शवविच्छेदन करण्यात आले. त्याचा अहवाल आल्यानंतरचा खून कि आत्महत्या हे स्पष्ट होण्यास मदत मिळणार आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close