क्राईम

वीज चोरी रोखण्यास गेलेल्या महावितरणच्या पथकावर हल्ला, एक कर्मचारी गंभीर जखमी

केज — नेहमीच ट्रांसफार्मर जळत असल्यामुळे वीज चोरीवर महावितरणकडून सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे. यातच वीज चोरी रोखण्यासाठी गेलेल्या पथकावर सोनिजवळा येथील कोकाटे वस्ती वर एका शेतकऱ्याने हल्ला चढवला डीपी तील फ्युज फेकून मारल्यामुळे महावितरण चा एक कर्मचारी गंभीर रित्या जखमी झाला आहे त्याच्यावर केज रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सध्या शेतकऱ्यांचा पिकाला पाणी देण्याचा सीजन नाही अशा स्थितीत अकरा केवी लाईन साकलाईन वरील ट्रांसफार्मर नेहमी जळत असल्यामुळे उपविभागामार्फत ट्रांसफार्मर वरून वीजचोरी होत नाही ना याकडे लक्ष दिले जात आहे. वीज चोरी करणाऱ्या शेतकऱ्यांना अधिकृत वीज जोडणी घेण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे. शेतकऱ्यांकडून कागदपत्र घेऊन त्यांना तात्काळ वीज कनेक्शन देण्यात येत आहे. शनिवारी सोनिजवळा येथे अनाधिकृत आकडे काढण्यासाठी सात जणांचे पथक गेले होते. येथील भवानी नगर मधील गावठाण डीपी वर असलेले आकडे व वायर काढून टाकले. येथील कारवाई पूर्ण झाल्यानंतर कोकाटे वस्ती पासून गेलेल्या अकरा केवी वीज वाहिनी व तेथील ट्रांसफार्मर ची पाहणी करण्यासाठी पथक गेले त्यावेळी आकडे टाकून वीजचोरी होत असल्याचे निदर्शनास आले. पथकाने येथे देखील कारवाई करत वीजचोरीचे आकडे काढले. त्यामुळे संतप्त झालेल्या एका शेतकऱ्याने पथकावर हल्ला चढवला. यावेळी त्याने ट्रांसफार्मर मधील किटकॅट चे फ्यूज काढून फेकून मारले यामध्ये दयानंद कावळे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. गंभीर जखमी झालेल्या कर्मचाऱ्यास केज उपजिल्हा रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे सध्या या कर्मचाऱ्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती उपकार्यकारी अभियंता राजेश आंबेकर यांनी दिली आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close