महाराष्ट्र

मोदींच्या स्वागताला उद्धव ठाकरे गैरहजर राहणार !

पुणे — प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर येत असले तरी त्यांच्या स्वागताला मुख्यमंत्री तसेच राज्यपाल उपस्थित राहू शकणार नाहीत. कोविड परिस्थितीमुळे पदाधिकारी आणि राजकीय व्यक्तींना स्वागतास उपस्थित राहण्यास पंतप्रधान कार्यालयाने परवानगी नाकारली आहे.मात्र या निर्णयाची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
देशातील कोणत्याही राज्यात प्रधानमंत्री गेल्यानंतर राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्याकडून प्रधानमंत्री यांचे स्वागत केले जाते. बहुतांश वेळी हा संकेत पाळला जातो. मात्र पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूट ला भेट देण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर काही वेळातच येणार असले तरीराजकीय व्यक्ती पदाधिकारी यांना स्वागतास उपस्थित राहण्याची परवानगी पंतप्रधान कार्यालयाने नाकारली आहे. पुणे विमानतळावर पंतप्रधान मोदींचे स्वागत ‘ सदर्न कमांड’चे लेफ्ट . जन . सी.पी. मोहंती , राज्याचे पोलीस महासंचालक सुबोधकुमार सहाय , विभागीय आयुक्त सौरभ राव , पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता , जिल्हाधिकारी राजेश देशमुख , एअर फोर्सचे कमांडर एच . असुदानी हे करणार असून सिरम इन्स्टिट्यूटमध्ये ‘ सिरम’चे संस्थापक सायरस पुनावाला , सीईओ आदर पुनावाला आणि कार्यकारी संचालक नताशा पूनावाला हे स्वागत करणार आहेत .
पंतप्रधानांच्या दौऱ्याची वेळ बदलली ! पंतप्रधान मोदींच्या पुणे दौयात सिरमला भेट देण्याची वेळ आधी दुपारी 1 ते 2 अशी निश्चित करण्यात आली होती . मात्र या वेळेत आता बदल करण्यात आला असून ही वेळ आता दुपारी 4.25 ते सायंकाळी 5.25 अशी करण्यात आली आहे . नव्या नियोजित वेळेनुसार दुपारी 3 वाजून 50 मिनिटांनी पंतप्रधान मोदी पुणे विमानतळ येथे पोहोचणार आहेत . तर 5 वाजून 55 मिनिटांनी ते दिल्लीसाठी रवाना होणार आहेत .

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close