क्राईम

पैठण तालुक्यात एकाच कुटुंबातील तिघांची हत्या

औरंगाबाद — एकाच कुटुंबातील तीन जणांची हत्या करण्यात आली असल्याची घटना पैठण तालुक्यातील जुने कावसन येथे घडली. यामध्ये आठ वर्षाच्या लहान मुलीचा देखील समावेश आहे मात्र सहा वर्षाचा मुलगा थोडक्यात बचावला असून जखमी अवस्थेत त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पैठण तालुक्यात असलेल्या जुने कावसन येथे संभाजी निवारे यांच्या नातेवाईकाकडे लग्न असल्यामुळे ते औरंगाबाद येथे खरेदीसाठी गेले होते. उशिरा रात्री जेवण करून झोपल्यानंतर अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या घरात घुसून तीक्ष्ण हत्याराने हल्ला चढवला. यामध्ये संभाजी निवारे त्यांच्या पत्नी अश्विनी निवारे, आठ वर्षाची मुलगी सायली यांचा जागीच मृत्यू झाला. मात्र या हल्ल्यामधून सहा वर्षाचा मुलगा सोहम हा थोडक्यात बचावला आहे त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शेजारील घराचे दार उघडे असल्यामुळे आत मध्ये डोकावून पाहिले असता हा प्रकार उघडकीस आला.या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व तिघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले आहेत पोलीस या प्रकरणात एकाच कुटुंबातील तिघांची का हत्या करण्यात आली, हत्येमागे हेतू काय आहे, याचा तपास करत आहेत.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close