क्राईम

बांधकाम मजूराने गवंड्याच्या डोक्यात दगड घालून केला खून

आष्टी — पहाटेच्या सुमारास गाढ झोपेत असलेल्या गवंड्याच्या डोक्यात बांधकाम मजुरांने दगड घालून खून केल्याची घटना देविनिमगांव येथे घडली. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी कांतीलाल काकडे यास अटक केली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार देवी निमगाव येथील वाळके अनारसे वस्तीवर गोरख नारायण पाचारणे यांचे बांधकाम सुरू आहे. गवंडी म्हणून या बांधकामावर ईश्वर दत्तू नवसुपे हा 27 वर्षीय युवक काम करत होता तर त्याच्या हाताखाली कांतीलाल मारुती काकडे हा 40 वर्षीय व्यक्ती म्हणून काम पाहत होता. बुधवारी रात्री काम आटोपल्यानंतर दोघेही काम सुरू असलेल्या ठिकाणी झोपले होते.

मात्र पहाटेच्या सुमारास ईश्वर नवसुपे हा झोपेत असताना त्याच्या डोक्यात मजूर असलेल्या कांतीलाल काकडे याने दगड घातला. ईश्वर नवसुपे हा रक्ताच्या थारोळ्यात जखमी अवस्थेत पडलेला असताना काकडे यांने बांधकाम मालकाच्या वाहनावर देखील दगडफेक केली. जखमी असलेल्या नवसुपे यास उपचारासाठी नगर येथे घेऊन जाण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी बांधकाम मालक गोरख पाचारणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल केला असून आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे ‌

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close