आपला जिल्हा

राजर्षी शाहू बँकेचे संस्थापक अर्जुनराव जाहेर पाटील यांचे निधन; मान्यवरांची श्रद्धांजली

बीड — येथील प्रसिध्द उद्योजक अर्जुनराव जाहेर पाटील यांचे दुःखद निधन झाले. अतिशय सामान्य परिस्थितीतून पुढे येऊन पाटील यांनी उद्योग- व्यवसाय आणि बँकिंग क्षेत्रात मोठा नावलौकिक मिळवला होता.

मराठवाड्यातील नावारूपास आलेल्या छत्रपती राजर्षी शाहू महाराज बँकेचे ते संस्थापक अध्यक्ष होते. मराठवाडा चेंबर्स चे ते अध्यक्ष होते. मराठवाडा शिक्षण प्रासारक मंडळासह अनेक संस्थांमध्ये त्यांनी काम केले. मृत्यू समयी त्यांचे वय 75 वर्षे होते.

पालकमंत्री धनंजय मुंडेनी वाहिली श्रद्धांजली

छत्रपती शाहू बँकेचे संस्थापक अर्जुन राव जाहेर पाटील यांच्या निधनाने बीड जिल्ह्याच्या सहकार क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. छत्रपती शाहू बँकेचे जाळे राज्यभर पसरवून सहकार उद्योग शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली त्यांना भावपूर्ण  श्रद्धांजली —धनंजय मुंडे

शिक्षण ,बँकिंग औद्योगिक क्षेत्रातील उमदे व्यक्तिमत्व गमावले-माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर

औद्योगिक क्षेत्राची प्रगती व्हावी यासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे आणि तरुणांना उद्योजकांना योग्य मार्गदर्शन करून औद्योगिक क्षेत्रासाठी सक्रिय राहून बँकिंग क्षेत्रात विश्वास संपादन करणारे नेतृत्व म्हणून अर्जुनराव जाहेर पाटील होते बँकिंग क्षेत्रात व औद्योगिक क्षेत्रातील तसेच शिक्षण क्षेत्रातील एक नेतृत्व गमावले असल्याची भावना माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी व्यक्त केली आहे

आज छत्रपती राजश्री शाहू अर्बन बँकेचे अध्यक्ष अर्जुनराव जाहेर पाटील यांच्या निधनाची वार्ता समजल्यानंतर माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी आपल्या शोकभवना व्यक्त केल्या आहेत,ते म्हणाले की बँकिंग क्षेत्रात व औद्योगिक क्षेत्रात असणारे एक नेतृत्व आज आपण गमावले आहे औद्योगिक क्षेत्रात सुरुवातीपासूनच मुंबई आणि जिल्हास्तरीय झालेल्या बैठकांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असायचा बँकांच्या प्रश्नांवर ते सातत्याने जागृती अग्रणी असायचे बँकिंग क्षेत्रात विश्वास संपादन करून बँकेचे विस्तारीकरण मोठ्याप्रमाणात करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे स्वतः इंजिनिअर ज्ञान असणारे छत्रपती शाहू अर्बन बँकेचे अध्यक्ष अर्जुन राव जाहीर पाटील औद्योगिक आणि बँकिंग क्षेत्रात विश्वसनीय आणि मार्गदर्शक म्हणून मानले जायचे त्यांच्या निधनामुळे मोठी पोकळी निर्माण झाली आहे माझ्या राजकीय वाटचालीत नेहमीच त्यांचे सहकार्य लाभले आहे

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close