ब्रेकिंग

टँकर कार अपघातात पाच जण ठार

गेवराई — भरधाव वेगाने जात असलेल्या कार चालकाचा ताबा सुटल्यामुळे समोरून येणाऱ्या टँकरला जोराची  धडक बसून झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना गेवराई बायपास रोडवर गुरुवारी सकाळी घडली मृतांमध्ये लातूरच्या वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्याचा समावेश असल्याची माहिती मिळाली आहे

गेवराई शहरातील जमजम पेट्रोल पंपाच्या पाठीमागे असलेल्या पेट्रोल पंपाच्या मागे असलेल्या बायपास रोडवर भरधाव वेगाने औरंगाबाद कडे कार जात होती. यावेळी कार चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले त्यामुळे इंडियन ऑइल च्या समोरून येणाऱ्या टँकरवर कार जोरात जाऊन धडकली. हा अपघात इतका भीषण होता की या दुर्घटनेत दोघा जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अन्य तीन जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले

असता उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला. या कारमधून लातूरच्या वंचित बहुजन आघाडी चे एक पदाधिकारी प्रवास करत असल्याची माहिती मिळाली आहे. मात्र यातील मृत झालेल्या व्यक्तींची नावे समजू शकली नाहीत.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close