आपला जिल्हा

निती’न’सलेल्या धार्मिकतेचा उच्छाद – 3 : गांधी नोटांची किमया न्यारी दारूबंदी कर्मचाऱ्यांना अवैध दारू विक्री प्यारी

बीड — जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयूक्त नितिन धार्मिक यांनी जवळपास प्रत्येक हॉटेल धाबा यांना स्वतःच्या हिमतीवर दारू विक्री साठी परवानगी दिली आहे. त्याबदल्यात मिळत असलेल्या गांधी छाप रुपयातून गांधीजींचे तत्वज्ञान देखील अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांकडून अंगिकारले जात आहे. परिणामी दारू विक्री करायची नाही हं. ती केल्यास संविधानात शिक्षेचे प्रावधान आहे

बरं असं धाबा खानावळी यांच्या मालकांना सांगत फिरत आहेत. शिवाय या ठिकाणी पोस्टर देखील लावण्यात येत आहेत. मेहुणी बायको मिंधा संसार असल्या कारणाने कारवाई काय असते हे दारूबंदी विभाग विसरूनच गेला आहे.

गेल्या दोन तीन दिवसांमध्ये ॲक्टिव मोडमध्ये असलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आम्ही किती जनजागृती करतो आहोत हे दाखवण्याचा व त्या आड होत असलेल्या कृष्णकृत्यांना झाकण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. सध्या जिल्ह्यात गाव खेड्यापासून ते शहर राष्ट्रीय महामार्गावरील, राज्यमार्गावरील बहुतांश धाब्यावर अवैध दारू विक्री दारू बंदी विभागाच्या सहकार्याने केली जात आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांच्या अभयदानावर हे सगळं सुरळीत चालू आहे. यातून बनावट दारू देखील मोठ्या प्रमाणावर विक्री केली जात आहे. आता शासनाच्या परवान्याची आवश्यकता जिल्ह्यात राहिली नसल्याचे चित्र निर्माण झाल आहे.या वास्तवावरचा पडदा उघडला जात असताना व या सर्व सुखेनैव चालू असलेल्या धंद्यातून होणाऱ्या गांधी छाप नोटांच्या कमाईने एवढी छाप या विभागावर पाडली आहे

 

की आता ते अगदी लहान मुलांना समजून सांगावं अशा भाषेत धाबा खानावळी यांच्या मालकाला समजावून सांगत फिरत आहेत. दारु बंदीतील कर्मचाऱी धाबा मालकाच्या खाल्लेल्या मिठाला जागत. कारवाई कशी करावी लागते? आपण जनसेवक आहोत की तुकड्यावर जगणारे हे आता विसरून गेले आहेत. दारू विक्री करू नका बरं अन्यथा शिक्षा होते असा समजून सांगण्याचा सूर एकीकडे हॉटेलमध्ये गेल्यानंतर या कर्मचाऱ्यांकडून आळवल्या जातो तर दुसरीकडे त्यांच्यासमोरच दारूच्या बाटल्या ग्राहकांना विकल्या जातात हे चित्र गेल्या दोन-तीन दिवसांमध्ये पहावयास मिळत आहे आम्ही काम खूप करत आहोत. याच्या खुणा ठेवण्यासाठी हॉटेल खानावळी मधून भित्तीपत्रक चिटकवली जात आहेत. फोटोसेशन देखील केले जात आहे.

किमान बीडचे पोलीस अधीक्षक यांनी अवैध धंद्या विरोधात कारवाई करा असे आदेश काढले आहेत किमान त्यामुळे तरी स्थानिक गुन्हे शाखा असेल किंवा संबंधित पोलिस ठाणे असेल यांना दहा ते पंधरा बाटल्या शिवाय जास्त बाटल्या दारूच्या सापडल्या नाहीत पण किमान त्यांना तरी एवढ्या सापडल्या कागदपत्रांची पूर्तता झाली कारवाई केल्याचं कागदोपत्री सिद्ध होऊ लागलं पण एवढे सुद्धा कष्ट घेण्याची हिम्मत निती ‘न’सलेल्या धार्मिक मध्ये नसल्याचं सध्या दिसत आहे. लोकांच्या घरादाराची वाट लागली तरी यांचा थाट होत असल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close