ब्रेकिंग

न्यायासाठी पाटबंधारे विभागात शेतकर्‍याने जाळून घेतले

बीड — पाटबंधारे विभागाकडून आपल्याला न्याय मिळत नसल्याने एका निराश शेतकर्‍याने कार्यालयामध्ये अंगावर पेट्रोल टाकून जाळून घेतल्याची खळबळजनक घटना मंगळवारी दुपारी घडली.जखमी अवस्थेत शेतकर्‍याला तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले.

शेतकर्‍याने यापूर्वी आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. याची दखल घेतली नसल्याने शेतकर्‍याने हे टोकाचे पाऊल उचलले.बीड तालुक्यातील पाली येथील अर्जून कुंडलिकराव साळुंके या शेतकर्‍याची जमीन पाटबंधारे विभागाने संपादीत केलेली आहे. या जमिनीच्या एकत्रीकरणाबाबतचा वाद आहे.गेल्या अनेक वर्षापासून शेतकरी पाटबंधारे विभाग कार्यालयाचे उंबरे झिजवत आहे.कार्यालयाकडून न्याय मिळत नसल्याने सदरील शेतकर्‍याने गेल्या काही महिन्यापूर्वी आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता.मात्र याची दखल संबंधीत विभागाने घेतली नाही.दुपारी शेतकर्‍याने कार्यालयात पेट्रोल ओतून घेत जाळून घेतले.या घटनेने एकच खळबळ उडाली. दरम्यान हा शेतकरी 90 टक्के भाजला गेला आहे.शेतकर्‍यास तात्काळ जिल्हा रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आले.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close