महाराष्ट्र

शिवसेनेचे आ. प्रताप सरनाईक यांच्या मूलास ईडीने ताब्यात घेतले

मुंबई — शिवसेनेचे ठाण्याचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या मुंबई ठाणे येथे असलेल्या कार्यालय व घरावर आज सकाळी छापा मारला. एकाच वेळी दहा ठिकाणी धाडी टाकल्यानंतर प्रताप सरनाईक यांचे चिरंजीव पूर्वेश सरनाईक व विहंग सरनाईक यांच्या घरी देखील ईडीने कारवाई केली. काही वेळापूर्वीच ईडीने विहंग यास ताब्यात घेऊन अधिकारी रवाना झाले आहेत.
आज सकाळी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक व त्यांच्या दोन्ही मुलांचे घर कार्यालयावर ईडीच्या पथकाने छापा मारला. या पथकाकडून अद्याप शोधमोहीम सुरू आहे दरम्यान या कारवाईमुळे शिवसेनेचे नेते प्रचंड संतापले आहेत. भाजपवर मोदी सरकार वर आगपाखड करण्यास सुरुवात केली आहे. सरनाईक यांच्या माजीवाडा भागातील दोस्ती मध्ये असलेल्या घरी तसेच वर्तक नगर मधील पाम क्लब च्या बाजूला असलेल्या इमारतीवर छापे टाकण्यात आले मात्र हे छापे का टाकण्यात आले याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. प्रताप सरनाईक हे अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी आक्रमक झाले होते त्यांनी रिपब्लिक टीव्ही चे संपादक अर्णव गोस्वामी यांच्यावर हक्कभंग प्रस्ताव नोटीस दिली होती. दरम्यान ईडीने 10 ठिकाणी छापेमारी केली. प्रताप सरनाईक यांचा मुलगा विहंग सरनाईक यास ईडीने चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close