ब्रेकिंग

शिंदेनी राशन दुकानदारांकडून रक्कम उकळली, त्यातील हिश्शासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या ठाणगेने त्यांची आई माय उधळली

बीड — तालुक्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदारांकडून तहसीलदार सुशांत शिंदे यांनी दिवाळीपूर्वी सतराशे रुपये गोळा केले. ते कशासाठी गोळा केले हे त्यांनाच माहीत.मात्र यातील हिस्सा मिळाला नसल्यामुळे तळपायाची आग मस्तकाला गेलेल्या रवि ठाणगेने साखरेच्या व डाळीच्या परमिट साठी आलेल्या राशन दुकानदारांची आई माय काढली. हा प्रकार राशन दुकानदारांना मात्र पश्चाताप करणारा ठरला आहे तरीही जिल्हाधिकारी आशा ह****** कर्मचाऱ्याला पाठीशी घालण्याच पाप का करत आहेत.त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रमाणीकतेवर देखील प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले आहे.
तालुका पुरवठा विभागात कुंडली मारून बसलेला ठाणगे तहसीलदार सुशांत शिंदे व नायब तहसीलदार राऊत यांना देखील जूमानायला तयार नाही. चलनाच्या नावाखाली राशन दुकानदारांची सर्रास लूट केली जात असली तरी ठाणगे ला जिल्हाधिकारी पाठीशी घालीत असल्यामुळे तहसीलदार व नायब तहसीलदार यांना गप्प बसून बुक्क्याचा मार सहन करावा लागत आहे. नेहमीच पुरवठा विभाग व तहसीलदारांची भूमिका विवादास्पद राहिली आहे यातच दिवाळीपूर्वी प्रत्येक राशन दुकानदारांकडून सुशांत शिंदे यांनी सतराशे रुपये उकळले. अर्थात ते कशासाठी उकळले त्यात भागीदार कोण होते हे अद्याप गुलदस्त्यात आहे. हे पैसे घेतल्याची चर्चा दबक्या आवाजात तहसील कार्यालयात होत आहे. अर्थात राशन दुकानदार व तहसीलदार यांच्यात झालेला हा व्यवहार जरी जन माणसासाठी गुपित असले तरी त्यामुळे त्यामुळे जिल्हाधिकार्‍यांनी पाठीशी घातलेल्या ठाणगे च्या मस्तकाची आळी वळवळली . राशन दुकानदारा कडून उकळलेल्या रकमेतील हिस्सा आपल्याला मिळाला नाही म्हणून त्यांनी साखर व डाळीच्या परमिट साठी आलेल्या राशन दुकानदारांना अरेरावीची भाषा वापरली. ठाणगे च्या तळपायाची आग इतकी मस्तकाला गेली होती की काही राशन दुकानदारांची आई माई उधळण्यात पर्यंत त्याची मजल गेली. गोरगरिबांची दिवाळी गोड करावी हा प्रामाणिक हेतू ठेवलेल्या राशन दुकानदारांना मात्र दिवाळीपूर्वी शुभेच्छांच्या ऐवजी शिव्यांचा धनी व्हावे लागले. पण दुर्दैवं असे की याची बोंब मारायची कुणाकडे हा प्रश्न राशन दुकानदारां पुढे निर्माण झाला. जिल्हाधिकारी ज्या माणसाला पाठीशी घालतो याच्या जोरावर तहसीलदार नायब तहसीलदार यांना ठाणगे सारखा थर्ड क्लास कर्मचारी फाट्यावर मारतो तिथे तक्रार करायची तर कोणाकडे करायची तक्रार करायला जावं तर जिल्हाधिकारीच आपल्यावरच कारवाई करतील या भीतीपोटी राशन दुकानदार यांनीदेखील खाली मान घालून ठाणगेने वाहिलेल्या शिव्यांची लाखोळी सहन केली. जिल्हाधिकाऱ्यांनी देखील आज पर्यंत प्रसिद्ध माध्यमांमधून प्रसिद्ध झालेल्या बातम्यांची कधीच दखल घेतली नाही हे या जिल्ह्याचे दुर्दैव आहे त्यामुळेच ठाणगे सारखी माणसं मस्तवाल बनत चालली आहेत. जिल्हाधिकारी अशा व्यक्ती विरोधात कारवाई करत नसल्यामुळे प्रसिद्धीमाध्यमांनी किती जरी बोंब ठोकली तरी त्याचा फायदा होत नाही एवढेच नाही तर अशा कर्मचाऱ्या विरोधात साधी कारणे दाखवा नोटीस काढण्याचं काम देखील जिल्हाधिकारी करत नाहीत. फक्त त्यांना तोंडी बोलावून घेतल्या जातं परिस्थितीचा आढावा घेतला जातो. तो कर्मचारी जिल्हाधिकाऱ्यांच्या केबिन मधून बाहेर पडला की कॉलर वर करून चालताना दिसतो. याची परिणीती पुढे ठाणगे सारख्या माणसाचा मस्तवाल पणा वाढण्यात होते. या सर्व प्रकारामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रामाणिकतेवरच जनतेतून प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. प्रशासनामध्ये त्यांनी त्यांच्या सोयीची माणसं जाणीवपूर्वक पेरून ठेवली आहेत की काय ? जेणेकरून ही मंडळी जनतेला वरिष्ठ अधिकाऱ्यांना वेठीस धरत आर्थिक हित जोपासतील त्यातला काहीसा भाग आपल्याला मिळेल हा हेतू तर जिल्हाधिकाऱ्यांचा नसावा अस आता बोललं जाऊ लागला आहे त्यामुळेच माध्यम ज्या अधिकाऱ्याच्या कर्मचाऱ्यांच्या विरोधात आवाज उठवतात त्यांना जिल्हाधिकारी पाठीशी घालतात हे चित्र प्रामाणिक असलेल्या जिल्हाधिकार्‍यांच्या हेतू बद्दलच शंका निर्माण करणारी आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close