ब्रेकिंग

निती’न’सलेल्या धार्मिकतेचा उच्छाद – 2 : जिल्ह्यात दारूचा महापुर बनावट दारूचाही जोर ?

बीड — जिल्ह्यातील प्रत्येक धाब्यावर गाव खेड्यांमध्ये दारू उपलब्ध होऊ लागली आहे. बीडचे दारूबंदी आयुक्त अर्थ सैनिकांना (बेवड्यांना) प्रोत्साहन देत. देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देत असल्याचे चित्र वरवरच दिसत असलं तरी देशाच्या तिजोरीला किती हातभार लागत आहे हे सांगणं बीडचा इतिहास पाहिला तर अवघड बनल आहे. जिल्ह्याला आजपर्यंत लाभलेल्या कर्तव्यदक्ष पोलिस अधिकाऱ्यांनी अनेक वेळा बनावट दारूचा भांडाफोड केलेला आहे. मग आता जिल्ह्यात होणारी दारू विक्री बनावट नाही हे छाती ठोकून कोणीही सांगू शकत नाही. देशाच्या तिजोरीच युवा पिढीच काहीही झालं तरी बेहतर अशी भूमिका घेत स्वतःची तिजोरी भरण्याचं काम सध्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच सुरू असल्याचं चित्र पहावयास मिळत आहे.

जिल्ह्यात लाॅक डाऊन लागण्यापूर्वी पासून दारूबंदी विभागाच्या कारवाया एकदम थंडावल्या गेल्या. लॉकडाउनच्या काळामध्ये लोकांना खायला भाकरी मिळाली नाही पण मद्य शौकिनांना दारू कमी पडली नाही पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या काळात काही प्रमाणात याला आळा घालण्याचा प्रयत्न केला गेला पण हा प्रयत्न एकतर्फीच ठरला गेला. त्याला दारूबंदी विभागाच सहकार्य कधीच लाभले नाही. आता तर पोलिसांच्या कारवाई होण्याचा प्रश्नच राहिला नाही. अवैध दारू विक्री प्रकरणी पोलिसांनी डोळेझाक केल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे. मात्र दारू बंदी विभागाने अवैध दारू विक्रीला एक प्रकारे प्रोत्साहनच दिले आहे. जिल्ह्यात सध्या हॉटेल ढाबे याबरोबरच टपर्‍यांवर देखील दारूविक्री सर्रास होऊ लागली आहे यातून नंबर दोन चे धंदे करणारांच व दारूबंदी विभागातील अधिकाऱ्यांचं अर्थचक्र जोरात फिरू लागला असलं तरी जिल्ह्यात विक्री होणारी दारू ही खरोखरच कंपन्यांनी तयार केलेली आहे की बनावट आहे हे कळायला मार्ग नाही. जिल्ह्याचा इतिहास पाहता आतापर्यंत बनावट दारू तयार करणारे कारखाने यापूर्वीच्या कर्तव्यदक्ष पोलिस अधिकाऱ्यांनी अनेक वेळा उद्ध्वस्त केले आहेत आता ती अशा पुरती मावळली गेली आहे. पंधरा-वीस बाटल्या पकडल्या तरी आपण खूप मोठे कर्तव्य केले आहे असं म्हणत पोलीस यंत्रणा स्वतःची पाठ थोपटून घेत आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी कर्मचारी स्वतःची तुंबडी भरण्यातच व्यस्त असल्यामुळे याच्यावर चा पडदा उघडला जाणार कसा असा प्रश्न निर्माण झाला आहे. गाव खेड्यामध्ये हात भट्टीचा व्यवसाय भरभराटीला आले आहेत. नंबर 2 च्या व्यवसायात निती ‘न’ सलेल्या धार्मिकतेच पालन केलं जात असल्यामुळे दारू बनावट विकली काय किंवा ओरिजनल विकली काय शेवटी नफेखोरी हप्ते खोरी ही महत्त्वाची असते. युवा पिढी अनेकांचे संसार देशाच अर्थकारण बरबाद झालं तरी अधिकाऱ्यांचा संसार मात्र आबाद होत असल्याचे चित्र निर्माण झाला आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close