महाराष्ट्र

तर राज्यात पुन्हा लाॅक डाउन ? नियमांचे पालन करा — अजित पवार

पूणे — करोना आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळत आहे. त्यामुळे पुन्हा लॉक डाऊन होऊ शकतो अशी चर्चा सुरू झाली आहे. त्या प्रश्नावर अजित पवार म्हणाले की, जगभरात करोना बाधित रुग्ण अद्याप ही आढळत आहे. त्यामुळे दुसरी लाट आपल्या इथे येईल असे बोलले जात आहे.आता दिवाळी सणानिमित्त रस्त्यावर झालेली गर्दी आणि त्यानंतर आता पुढील आठ ते दहा दिवसातील रुग्ण संख्येचा विचार करून, पुढील निर्णय घेतला जाणार आहे. पण एवढ्यात लॉक डाऊन होईल, असे बोललो तर नागरिक पॅनिक होतील. अशी भूमिका त्यांनी मांडली. तसेच नागरिकांनी शासनाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन त्यांनी केले.

कार्तिकी एकादशी बाबत अजित पवार यांना विचारले असता ते म्हणाले की, पूजा कोण करणार हा राज्य सरकारचा निर्णय असतो.
मात्र परंपरेनुसार आषाढीला मुख्यमंत्री आणि कार्तिकीला उपमुख्यमंत्री किंवा सिनियर मंत्री पुजा करतात. त्यानुसार राज्य सरकार निर्णय घेईल, असे त्यांनी सांगितले.

करोना आजाराचा फटका सर्व क्षेत्राला बसला असून पूर्वीसारखी परिस्थिती होण्याच्या दृष्टीने सरकार काम करीत आहे. मात्र त्याच दरम्यान दिवाळी सणानिमित्त रस्त्यावर प्रचंड गर्दी पाहण्यास मिळाली. आपल्या पुण्यातील बाजीराव रोडवर एवढी गर्दी झाली की, गर्दीत करोना चेंगरून मेला की काय असे मला वाटले, असे विधान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात मेळाव्यात करताच सभागृहात एकच हंशा पिकला.

यावेळी अजित पवार म्हणाले की, एकदा करोना झाला म्हणजे पुन्हा होत नाही. हे मनातून काढून टाका, पुन्हा मानगुटीवर बसू शकतो. त्यामुळे सर्वानी काळजी घ्यावी आणि सर्व नियमांचे पालन करावे तसेच आता करोना आजाराची दुसरी लाट येणार असे अनेक तज्ञ मंडळी सांगत आहेत. त्यामुळे सर्व नागरिकांनी शासनाकडून येणार्‍या नियमांचे पालन करण्याचे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close