देश विदेश

भाजपशासित उत्तराखंड सरकार कडून आंतरधर्मीय आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन

देहराडून — प्रत्येक राज्यानुसार भाजपची बदलती नीती पून्हा उघडकीस आली आहे. भाजपची सत्ता असलेल्या काही राज्यांनी लव जिहाद विरोधात कडक कायदा करण्याच्या दिशेने पावले उचलली आहेत तर दुसरीकडे भाजपची सत्ता असलेल्या उत्तराखंड सरकारने मात्र आंतरधर्मीय आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देण्यासाठी अशा जोडप्यांना 50 हजार रुपये अनुदान देण्याची योजना सुरु केली आहे.
‌ ‌. एकीकडे मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि हरियाणासारखी भाजपाशासित राज्ये लव्ह जेहादविरोधात आक्रमक भूमिका घेत आहेत . त्यामुळे नव्या वादाला सुरुवात झाली आहे. दरम्यान अशातच उत्तराखंड सरकारकडून ही रोख त्या सर्व जोडप्यांना मिळत आहे ज्यांचा विवाह वैधरीत्या नोंदणी केलेला आहे. ही माहिती राज्य समाजकल्याण विभागाच्या एका अधिकाऱ्याने दिली आहे. आंतरजातीय विवाहासाठीची 50 हजार रुपयांची प्रोत्साहन रक्कम मिळलण्यासाठी एक अट ठेवण्यात आली आहे. त्यानुसार पती किंवा पत्नी यांच्यापैकी एकजण कलम 341 मध्ये नोंद असलेल्या अनुसूचित जातींमधील असावा.

टेहरीचे सामाजिक कल्याण अधिकारी दीपांकर घिडिया यांनी सांगितले की, अन्य जाती आणि अन्य धर्मामध्ये विवाह करणाऱ्यांना देण्यात येणारी रक्कम राष्ट्रीय ऐक्याला प्रोत्साहन देण्यामध्ये महत्चपूर्ण ठरू शकते. या योजनेचा फायदा घेण्यासाठी विवाहाच्या एक वर्षाच्या आत अर्ज देणे आवश्यक आहे.
यापूर्वी या योजनेंतर्गत आंतरजातीय आणि आंतधर्मीय विवाह करणाऱ्यांना 10 हजार रुपयांची प्रोत्साहन रक्कम देण्यात येत असे. मात्र 2014 मध्ये राज्य सरकारने उत्तर प्रदेश आंतरजातीय आंतरधर्मीय विवाह प्रोत्साहन नियमावली 1976 मध्ये दुरुस्ती करून ही रक्कम 10 हजारांवरून 50 हजार एवढी केली. 2000 मध्ये वेगळ्या राज्याची निर्मिती झाली असताना उत्तराखंडने हा कायदा उत्तर प्रदेशकडून घेतला होता.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close